आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-भारतीय संस्कृतीचे अमर काव्यवैभव जपणाऱ्या महाकवी कालिदासांना अभिवादन;श्री शिवाजी विद्यालयात कालिदास जयंती उत्साहात साजरी.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

भारतीय संस्कृतीचे अमर काव्यवैभव जपणाऱ्या महाकवी कालिदासांना अभिवादन;श्री शिवाजी विद्यालयात कालिदास जयंती उत्साहात साजरी.

कराड : भारतीय संस्कृत साहित्यातील श्रेष्ठ कवी, नाटककार आणि ‘कविकुलगुरू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाकवी कालिदास यांच्या जयंतीनिमित्त कराड येथील श्री शिवाजी विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात विविध सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषा, भारतीय संस्कृती आणि समृद्ध साहित्यपरंपरेविषयी अभिमान व जिज्ञासा निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयाच्या संगीत विभागातर्फे स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. टी. डी. जाधव हे होते. प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. सुनंदा पाटील, माजी संस्कृत शिक्षिका, ताराराणी विद्यापीठ, कोल्हापूर या उपस्थित होत्या.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सौ. सुनंदा पाटील यांनी महाकवी कालिदास यांच्या अभिज्ञानशाकुंतलम्, मेघदूत, कुमारसंभव आणि रघुवंश यांसारख्या अजरामर साहित्यकृतींचा उल्लेख करत त्यांच्या साहित्यवैभवाचा, निसर्गचित्रणाचा आणि भारतीय संस्कृतीच्या जतनातील योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच हिंदी व मराठी साहित्यावर कालिदास यांच्या साहित्याचा झालेला प्रभाव स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्याची गरज अधोरेखित केली. आधुनिक काळात संस्कृत भाषेचे शैक्षणिक, संशोधनात्मक आणि व्यावसायिक महत्त्वही त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी महाकवी कालिदास यांच्या जीवन व साहित्यावर आधारित तयार केलेल्या आकर्षक भित्तीपत्रकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्या व मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संस्कृत कवींच्या जीवन आणि साहित्यावर आधारित माहितीपूर्ण चित्रफितीचे प्रदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. पवार मॅडम यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना महाकवी कालिदास यांच्या साहित्याचा परिचय होण्याबरोबरच संस्कृत भाषा, भारतीय संस्कृती आणि समृद्ध साहित्यपरंपरेबद्दल अभिमान, प्रेरणा आणि अभ्यासाची नवी दिशा मिळाली.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button