श्रीरामपूर:-दुबैय्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस महासंचालक डॉ. निखिल गुप्ता व SID प्रमुख शिरीष जैन श्रीरामपूरात दाखल.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीरामपूर:-दुबैय्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस महासंचालक डॉ. निखिल गुप्ता व SID प्रमुख शिरीष जैन श्रीरामपूरात दाखल.

श्रीरामपूर | RPS STAR NEWS प्रतिनिधी
श्रीरामपूर शहरातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर आणि ११ जुलै रोजी युवा उद्योजक आकाश दुबैय्या यांच्या झालेल्या निर्घृण हत्येनंतर राज्य पोलीस प्रशासन पूर्णपणे ॲक्टिव्ह मोडवर आले आहे.
दि. २० जुलै २०२६ रोजी राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) डॉ. निखिल गुप्ता तसेच राज्य गुप्त वार्ता विभाग (SID) चे प्रमुख शिरीष जैन यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यास भेट देऊन शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा तसेच दुबैय्या हत्याकांडाच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय यनपुरे, अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) जयदत्त भवर तसेच पोलीस निरीक्षक खैरे उपस्थित होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडून तपासाची माहिती घेतली असून, गुन्ह्याचा तपास अधिक वेगाने व प्रभावीपणे पूर्ण करण्याबाबत आवश्यक सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या उच्चस्तरीय भेटीमुळे श्रीरामपूरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेतल्याचे स्पष्ट झाले असून, दुबैय्या हत्याकांडाचा तपास अधिक गतीने होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION



