क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-आकाश दुबैय्या हत्या प्रकरण : बेलापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; उद्या न्यायासाठी श्रीरामपुरात भव्य मोर्चा

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 श्रीरामपूर:-आकाश दुबैय्या हत्या प्रकरण : बेलापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; उद्या न्यायासाठी श्रीरामपुरात भव्य मोर्चा

श्रीरामपूर | RPS स्टार न्यूज प्रतिनिधी

शहरातील युवा हिंदू उद्योजक तथा लक्ष्मीनारायण पॅलेस हॉटेलचे मालक स्व.आकाश शेखर  दुबैय्या यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ श्रीरामपूर शहरातील जनआक्रोश दिवसेंदिवस तीव्र होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेला बेमुदत श्रीरामपूर बंद कडकडीतपणे सुरू असून, या आंदोलनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर आज बेलापूर गावही पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. व्यापारी, व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळत दुबैय्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी एकमुखी मागणी केली.

दरम्यान, दुबैय्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी उद्या मंगळवार, दि. १५ जुलै रोजी सकाळी १० वाजता हनुमान मंदिर (स्टेशन मारुती) येथून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये विविध सामाजिक, व्यापारी, धार्मिक व सर्वपक्षीय संघटनांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

तसेच, या हत्येमागील संपूर्ण संघटित गुन्हेगारी टोळीवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात यावी, ही मोर्चाची प्रमुख मागणी असणार आहे.

याचबरोबर, श्रीरामपूर तालुका पेट्रोल पंप असोसिएशनच्या वतीने दुबैय्या कुटुंबाला पाठिंबा दर्शविण्यासाठी उद्या सकाळी १० ते १२ या वेळेत दोन तास सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा प्राथमिक निर्णय घेण्यात आला आहे. तहसीलदार यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीनंतर असोसिएशन अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आकाश दुबैय्या हत्या प्रकरणामुळे श्रीरामपूर तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, आरोपींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार विविध संघटनांनी व्यक्त केला आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button