क्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
उंदरखेल:-मढी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात कानिफनाथ सेवा संघ, उंदरखेल यांच्याकडून भाविकांचे स्वागत.
पत्रकार अमजद शेख बीड जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

विशेष बातमी
उंदरखेल:-मढी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात कानिफनाथ सेवा संघ, उंदरखेल यांच्याकडून भाविकांचे स्वागत.

मढी ते पंढरपूर पायी निघालेल्या श्री कानिफनाथ महाराज यांच्या दिंडी सोहळ्याचे उंदरखेल येथील कानिफनाथ सेवा संघाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.
यावेळी दिंडीतील वारकरी व भाविकांसाठी चहा-पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. सेवा संघाच्या या उपक्रमाचे वारकरी व उपस्थितांनी कौतुक केले. “वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा” या भावनेतून हा सेवा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी कानिफनाथ सेवा संघाचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि अनेक वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात आणि जयघोषात हा स्वागत सोहळा पार पडला.
RPS STAR NEWS
“जनतेचा विश्वास… सत्याचा ध्यास!”




