आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पुणे:-(वारजे)-डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त वारजे टेकडीवर भव्य वृक्षारोपण; आमदार भीमराव (अण्णा) तापकीर यांच्या हस्ते शुभारंभ.

पत्रकार विजय देवकुळे पुणे जिल्हा उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 820871748

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त वारजे टेकडीवर भव्य वृक्षारोपण; आमदार भीमराव (अण्णा) तापकीर यांच्या हस्ते शुभारंभ.

पुणे -(वारजे) : भारतीय जनसंघाचे संस्थापक, महान विचारवंत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त वारजे येथील टेकडीवरील शनी मंदिर परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाला खडकवासला विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री. भीमराव (अण्णा) तापकीर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. यावेळी त्यांनी प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले.

या भव्य उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात नगरसेवक भारतभूषण (आबा) बराटे यांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावत हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

यावेळी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे चिटणीस श्री. धनंजय मसे, ओबीसी आघाडीचे चिटणीस श्री. बाळासाहेब हिंगणे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष श्री. गणेश वरपे, नगरसेविका सौ. सायली वांजळे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, वारजे परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध देशी वृक्षांची लागवड करत उपस्थितांनी “झाडे लावा, झाडे जगवा” आणि “हरित वारजे – स्वच्छ वारजे” हा संदेश दिला.

वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्पही सर्वांनी केला.
सम्राट मित्र मंडळाचे उत्कृष्ट नियोजन, निसर्ग सेवा संस्थेची निरंतर सेवा आणि आपल्या सर्व आदरणीय नेते व सहकाऱ्यांची खंबीर साथ यांच्या सुंदर संगमातून उद्याचे हिरवेगार, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त भविष्य निश्चितच घडेल, यात कोणतीही शंका नाही. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाबरोबरच सामाजिक एकजूट आणि लोकसहभागाचे प्रेरणादायी उदाहरण ठरला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button