आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबई:-सह्याद्री सायन प्रतिष्ठानचा सामाजिक पुढाकार; कशेडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सह्याद्री सायन प्रतिष्ठानचा सामाजिक पुढाकार; कशेडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य.

मुंबई | प्रतिनिधी : समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत सह्याद्री सायन प्रतिष्ठानने खेड तालुक्यातील कशेडी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी आणि शाळा प्रशासनाने कौतुक केले.

मुंबईच्या सायन येथील सह्याद्री सायन प्रतिष्ठानचे सदस्य दरवर्षी कशेडी गावाला भेट देतात. गावाचे मूळ रहिवासी विश्वनाथ खळे यांच्या माध्यमातून गावाशी जुळलेले जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ झाले आहे. गावकऱ्यांकडून मिळणारे प्रेम, आपुलकी आणि सहकार्य याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स तसेच अन्य आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने त्यांच्या शिक्षणाला निश्चितच बळ मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्याचा मानसही प्रतिष्ठानच्या सदस्यांनी व्यक्त केला.

या उपक्रमात विश्वनाथ खळे, संगम कोळी, दुर्वेश गावंड, निलेश सोलकर, महेंद्र केणी, अक्षय रेवाळे, सुशांत रेवाळे, प्रशांत बामणे आणि सूरज बंगाल यांनी सक्रिय सहभाग घेतला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button