दादर:-श्री संतोष आनंद गायकवाड यांना ‘कला गौरव २०२६’ पुरस्काराने सन्मान.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्री संतोष आनंद गायकवाड यांना ‘कला गौरव २०२६’ पुरस्काराने सन्मान.

मुंबई, दि. १२ जुलै : ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’ आयोजित पहिला पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, कला, साहित्य आणि समाजसेवक पुरस्कार सोहळा २०२६ रविवारी, दि. १२ जुलै २०२६ रोजी दादर (पूर्व), मुंबई येथील सुरेंद्र गवास्कर हॉल (मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय) येथे दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.
या पुरस्कार सोहळ्यात कला, साहित्य, पत्रकारिता, समाजसेवा आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी *संतोष आनंद गायकवाड यांना कला, सिनेमॅटोग्राफी, छायाचित्रण, दिग्दर्शन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘कला गौरव २०२६’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.*
या सोहळ्यास जगप्रसिद्ध बोलका बाहुलाकार व जादूगार श्रीधर कीर, “कुटुंब रंगलंय काव्यात”चे सादरकर्ते प्रा. विसुभाऊ बापट, प्रसिद्ध कवी व साहित्यिक अरुण म्हात्रे, साहित्याचार्य व दर्याचा राजाचे संपादक पंढरीनाथ तामोरे, ज्येष्ठ पत्रकार व जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ मधुसूदन तिरपणकर, तसेच संस्थापक-अध्यक्ष अॅड. सुनिल भार्गवराम शिर्के यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
*संतोष आनंद गायकवाड हे छायाचित्रकार, सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक म्हणून गेली अनेक वर्षे कला क्षेत्रात कार्यरत असून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्येही त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.*
पुरस्कार स्वीकारल्यानंतर संतोष आनंद गायकवाड यांनी आयोजक आर्यारवी एंटरटेनमेंट, प्रमुख अतिथी, परीक्षक, सहकारी, कुटुंबीय आणि सर्व शुभेच्छुकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. भविष्यातही कला, संस्कृती आणि समाजहिताच्या कार्यात अधिक जोमाने योगदान देण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.




