वाई:-“अनधिकृत बांधकामावर तात्काळ सील ठोका; पाठराखण करणाऱ्या नगरसेवकांना पदमुक्त करा!” — पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-“अनधिकृत बांधकामावर तात्काळ सील ठोका; पाठराखण करणाऱ्या नगरसेवकांना पदमुक्त करा!” — पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

दिनांक 13 जुलै रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे जिल्हाधिकारी सातारा यांचे भेट घेण्यात आली. यावेळी वाई नगरपरिषद हद्दीमध्ये राजरोसपणे ,कोणत्याही सक्षम प्राधिकरणाचे परवानगी न घेता बेकायदेशीर अनधिकृत व्यावसायिक बांधकाम सुरू आहेत. त्याचबरोबर सिटी सर्वे नंबर 878 वर कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता एक बांधकाम दिवसाढवळ्या चालू आहे. वाई नगर परिषदेचे टाऊन प्लॅनिंग ऑफिसर यांनी संबंधित बांधकामास नोटीस देऊन देखील सदर बांधकाम सुरू आहे. माहिती घेतली असता लोकांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की वाई नगर परिषदेचे नगरसेवक अजित शिंदे यांनी संबंधित काम घेतले आहे. यावर जर नगरसेवकच आता अनधिकृत बांधकाम करण्याचे काम घेतील आणि त्याला खतपाणी घालतील तर वाई शहरात टाउन प्लॅनिंगच्या चिंध्या उडाल्याशिवाय राहणार नाहीत. संबंधित नगरसेवक अजित शिंदे हे सदर बांधकामाला अभय देत, नगरपरिषदेने नोटीस देऊन देखील तसेच काम दिवसाढवळ्या प्रशासनाला चॅलेंज करून स्वतःच्या पदाचा गैरफायदा घेऊन करत आहेत. तरही आता पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांनी युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे, वाई तालुकाध्यक्ष विजय भाऊ सातपुते यांच्या उपस्थिती संबंधित बांधकाम सील करा व त्याला अभय देणारे नगर सेवक अजित शिंदे यांना पदमुक्त करा अन्यथा आंदोलन करू. असा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.




