कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाबळेश्वर–तापोळा (१०५ गाव) महामार्गावर मृत्यूचे खड्डे; नगरपरिषद झोपेत? नागरिकांचा संताप, तात्काळ दुरुस्तीची मागणी.

पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

महाबळेश्वर–तापोळा (१०५ गाव) महामार्गावर मृत्यूचे खड्डे; नगरपरिषद झोपेत? नागरिकांचा संताप, तात्काळ दुरुस्तीची मागणी.

महाबळेश्वर | प्रतिनिधी
महाबळेश्वर–तापोळा (१०५ गाव) हा तालुक्याचा प्रमुख व अत्यंत महत्त्वाचा संपर्क महामार्ग सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला असून, नगरपरिषद हद्दीतील सेठ गंगाधर मकरिया हायस्कूल ते कारवीआळा (सुमारे १ ते १.५ कि.मी.) तसेच सातारा नाका ते एमपीजी क्लब या मार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक, पर्यटक व वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. या गंभीर परिस्थितीबाबत संविधान प्रचारक उत्तम भालेराव जबाबदार व जागृत नागरिक तथा संविधान प्रचारक यांनी महाबळेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे कडक निवेदन सादर करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीच्या घोषणा अनेक दिवसांपासून होत असल्या तरी प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. उलट विविध विकासकामांनंतर रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. पावसामुळे खड्डे पाण्याखाली जात असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकी, चारचाकी आणि पर्यटन वाहने खड्ड्यात आदळून अपघात व आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
उत्तम भालेराव जबाबदार व जागृत नागरिक यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१ नुसार प्रत्येक नागरिकाला सुरक्षित जीवनाचा मूलभूत अधिकार आहे. सार्वजनिक रस्ते सुरक्षित ठेवणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची कायदेशीर जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्यास संबंधित यंत्रणांची जबाबदारी निश्चित केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
निवेदनात तात्पुरत्या स्वरूपात सर्व खड्डे दगडी मुरूम व खडी टाकून तात्काळ बुजविणे, कायमस्वरूपी डांबरीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू करणे, धोकादायक ठिकाणी इशारा फलक व बॅरिकेड्स उभारणे आणि झालेल्या कारवाईचा लेखी अहवाल देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, योग्य वेळेत कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र लोकायुक्त आणि मानवाधिकार आयोग यांच्याकडे दाद मागून पुढील कायदेशीर पावले उचलण्यात येतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
महाबळेश्वरसारख्या जागतिक पर्यटनस्थळी प्रमुख रस्त्याची झालेली दुरवस्था ही केवळ विकासकामांचा प्रश्न नसून सार्वजनिक सुरक्षिततेचा आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा गंभीर विषय बनला आहे. आता नागरिकांचे लक्ष महाबळेश्वर नगरपरिषदेच्या तातडीच्या कार्यवाहीकडे लागले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button