क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कणकवली:-बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडन्याचे प्रयत्न करणारा चोरटा सहा तासांच्या आत गजाआड.

पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 कणकवली:-बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडन्याचे प्रयत्न करणारा चोरटा सहा तासांच्या आत गजाआड.

कणकवली येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला अखेर काही तासांमध्ये कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले. अथर्व राणे (रा. कळसुली गवसेवाडी, व बिडवाडी वय 20) असे या संशयीत चोरट्याचे नाव असल्याची माहिती कणकवली पोलिसांनी दिली. दरम्यान कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सीसीटीव्ही फुटेचा आधार घेऊन चोरट्याला त्याच्या घराकडून शिताफीने ताब्यात घेतले. दरम्यान या चोरट्याने चोरीचा प्लान कसा केला किंवा त्या अनुषंगाने माहिती घेण्यासाठी सदर चोरट्यावर गुन्हा दाखल करत त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान संशयित चोरटा हा कळसुली गावसेवाडी येथे नातेवाईकांकडे राहतो. तसेच तो काही वेळा बिडवाडी येथे देखील नातेवाईकां जवळ असतो अशी माहिती पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी दिली. कणकवली पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे जनतेतून कौतुक केले जात आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS  REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button