“श्रीरामपुर हादरले! भरदिवसा हॉटेलमध्ये घुसून तरुण हॉटेल व्यावसायिकाची चाकूने निर्घृण हत्या; शहरात खळबळ”
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“श्रीरामपुर हादरले! भरदिवसा हॉटेलमध्ये घुसून तरुण हॉटेल व्यावसायिकाची चाकूने निर्घृण हत्या; शहरात खळबळ”
श्रीरामपुर शहरात भरदिवसा हॉटेल व्यावसायिकाचा खून; हॉटेलमध्ये घुसून चाकूने केले वार, शहरात भीतीचे वातावरण.
श्रीरामपुर | RpS स्टार न्यूज प्रतिनिधी
श्रीरामपूर शहरातील नेवासा रोड परिसरात शनिवारी (दि. ११ जुलै) दुपारच्या सुमारास घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. नेवासा रोडवरील हॉटेल लक्ष्मीनारायणचे तरुण चालक-मालक आकाश दुबैय्या यांची त्यांच्या स्वतःच्या हॉटेलमध्येच चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारी सुमारे ४.०० वाजण्याच्या सुमारास आरोपी सूरज जाधव व त्याच्या साथीदारांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून आकाश दुबैय्या यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत आकाश दुबैय्या यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र जगधने यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी सूरज जाधव हा नेवासा रोडवरील बसस्थानकासमोर चिकन टिक्क्याची गाडी चालवत असून त्याचे शहरातील एका सराईत गुन्हेगाराशी संबंध असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समोर येत आहे. या माहितीची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून पुरावे संकलित करण्यात आले.
भरदिवसा गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या खुनामुळे श्रीरामपूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.




