आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबई:-“सेवेचाच खरा वाढदिवस! शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मुंबई महानगर प्रमुख सुरेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान, फळवाटप आणि आदिवासी बांधवांसाठी सेवाभावाचा अनोखा उपक्रम”

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मुंबई:-“सेवेचाच खरा वाढदिवस! शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मुंबई महानगर प्रमुख सुरेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान, फळवाटप आणि आदिवासी बांधवांसाठी सेवाभावाचा अनोखा उपक्रम”

मुंबई | प्रतिनिधी
वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे किंवा जल्लोष नव्हे, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी जपत गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे, हा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मुंबई महानगर प्रमुख सुरेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध सेवाभावी कार्यक्रम राबवून वाढदिवस समाजसेवेला समर्पित करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान करण्यात आले. तसेच रुग्णांना त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी फळांचे वाटप करण्यात आले. या सेवाभावी कार्यामुळे अनेक गरजू कुटुंबांना दिलासा मिळाला.


त्यानंतर महेंद्र सुधाकर शेडगे यांच्या वाढदिवसानिमित्त बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन लहान मुलांना चॉकलेट व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि आदिवासी बांधवांनी व्यक्त केलेला कृतज्ञतेचा भाव या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
या सेवाभावी कार्यक्रमास शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये दक्षिण मुंबई विभाग प्रमुख ललित शिवकांत शिंदे, मागाठाणे विभाग प्रमुख सुरज दिनेश मरगज, कांदिवली–मालाड–चारकोप विधानसभा प्रमुख महेंद्र सुधाकर शेडगे, दिंडोशी विभाग प्रमुख दीपक विजय सोनी, मालाड विभाग प्रमुख दीपक दाभाडे, मुंबई उपनगर प्रमुख सचिन पार्वती शंकर पाटील, वडाळा विधानसभा विभाग प्रमुख अनिकेत राजश्री रमेश लाड, कांदिवली विधानसभा प्रमुख अमोल मात्रे यांच्यासह शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सर्व मुंबई पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुंबई महानगर प्रमुख सुरेश शिंदे यांनी सांगितले की, “समाजातील गरजू, रुग्ण आणि वंचित घटकांच्या सेवेसाठी केलेले कार्य हाच माझ्यासाठी वाढदिवसाचा सर्वात मोठा आनंद आहे. अशा सेवाभावी उपक्रमांची परंपरा भविष्यातही सातत्याने सुरू राहील.”
या उपक्रमाचे नागरिक, रुग्ण आणि उपस्थित मान्यवरांनी मनापासून कौतुक केले. समाजसेवेच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याची ही संकल्पना अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली असून, “सेवेतूनच समाज परिवर्तन” हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button