वाई:-संशोधन क्षेत्रात किसन वीर महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-संशोधन क्षेत्रात किसन वीर महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी.

वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागातील सहायक प्रा. राहुल तायडे यांनी केलेल्या संशोधनातून दोन कोळ्यांच्या नवीन लिंक्स स्पायडर प्रजातींचा शोध लागला आहे. या नव्या प्रजातींना त्यांनी ‘‘हॅमाड्रआस केव्हीएमइनसिस’’ व ‘‘ऑक्सिओप्स वाईइनसिस’’ अशी शास्त्रीय नावे देण्यात आली आहेत. प्रा. तायडे हे वाई येथील किसन वीर महाविद्यालयात कार्यरत असल्याने, महाविद्यालयाचे व वाई शहराचे नावे जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी त्यांनी ही नावे नव्या प्रजातींना दिली आहेत. सहायक प्रा. तायडे यांच्या या संशोधनामुळे वाईचे नाव जागतिक जैवविविधता संशोधनक्षेत्रात ठळकपणे पोहोचले आहे.
“टू न्यू लिंक्स स्पायडर स्पेसीज ऑफ हॅमाड्रआस,ऑक्सिओप्स ॲन्ड द फर्स्ट रेकॉर्ड ऑफ हॅमाड्रआस थोरेल, १८८७ (ॲरॅनी:ऑक्सिओपीडी) फ्रॊम, वाई, महाराष्ट्र, इंडिया” हा त्यांचा शोधनिबंध ‘उत्तर प्रदेश जरनल ऑफ झुऑलॉजी’ या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. वाई परिसरातून ‘हॅमाड्रआस’ या कोळी प्रजातीच्या वंशाची प्रथमच शास्त्रीय नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ‘कोळी’ जैवविविधतेच्या अभ्यासासाठी हे संशोधन महत्वपूर्ण माणले जात आहे.
प्रा. तायडे यांनी हे संशोधन हिंदवी रिसर्च सेंटर, सातारा येथील संचालक प्रा. डॉ. विश्वास देशपांडे तसेच झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. संशोधनादरम्यान सातारा जिल्ह्यातील विविध नैसर्गिक अधिवासांमध्ये त्यांनी क्षेत्रीय सर्वेक्षण करून त्यांचे नमुने संकलित करण्यात आले व त्यानंतर त्याचे शास्त्रीय विश्लेषण करण्यात आले.
सदरच्या संशोधनातील कोळी प्रजातींचे नमुने पुणे येथील झुऑलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया येथे नोंद करण्यात आली आहे. या संशोधनामुळे महाराष्ट्रातील कोळी प्रजातींची नवीन माहिती उपलब्ध झाली असून‚ अभ्यासकांच्या दृष्टीने ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, उपाध्यक्ष मा. शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, सहसचिव प्रा. नारायण चौधरी, सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा. डॉ. विनोद वीर, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.




