श्रीरामपूर:-महांकाळ वाडगांवतील महिलांचा गावात दारू बंदी साठी यलगार !!!
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीरामपूर:-महांकाळ वाडगांवतील महिलांचा गावात दारू बंदी साठी यलगार !!!

श्रीरामपुर तालुक्यातील गोदावरी नदी काठच्या महांकाळ वाडगांव गावातील 30 पेक्षा जास्त महिला बचत गटांच्या महिलांनी मिळून गावात दारू बंदी घालण्यात यावी यासाठी लढाई सुरू केली आहे,गावातील महिलानी ग्रामपंचायतमध्ये महांकाळ वाडगांव चे सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य,सर्व ग्रामस्थ व समस्त महिला भगिनी यांचे उपस्थितीत ग्रामसभा घेऊन गावात दारू बंदी करण्याचा ठराव पास केला.
महिलांच्या तक्रारीनुसार गावात दारू विक्री खूपच मोठ्या प्रमाणात सुरू आहे सतत त्यात वाढच होत आहे सदर अवैध दारूची दुकाने मध्य वस्तीत असून गावातील महिला,तरुण मुली यांना सदर भागातून जाणे येणे अत्यंत अवघड झाले आहे या दारूच्या दुकानांवर दारू पिणाऱ्या लोकांची सतत गर्दी असते, दारू पिणाऱ्यामुळे गावातील सामाजिक स्वास्थ,वातावरण खराब होत आहे गावात भांडणे ,मारामाऱ्या यासारखे प्रकार वाढत असून गुन्हेगारी प्रवृत्ती बळावत चालली आहे तरुण मुले व्यसनाधीन होत आहेत त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांचे भवितव्य अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही वरील सर्व बाबींचा विचार करता महांकाळ वाडगांव गावात दारू बंदी,दारू विक्री बंदी घालने काळाची गरज बनली आहे दारू बंदी घालण्यात आल्यास गावाचे सामाजिक स्वास्थ,वातावरण सुधारण्यास मदत होणार आहे.
असे निवेदन महांकाळ वाडगांवतील 30 महिला बचत गटांनी निवेदनद्वारे श्रीरामपूरचे तहसीलदार श्री मिलिंदकुमार वाघ ,श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशन निरीक्षक श्री धनावडे,राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक चे दू.पो.नी.श्री संदीप मांडवेकर यांना देण्यात आले या प्रसंगी महिला बचत गटांच्या श्रीमती सुनीताताई वानखेडे,सुलताना बेग,दिपाली महांकाळे,भाग्यश्री महांकाळे,शोभा चोरमल,आरती खुरुद,मिनाज शेख,वंदना महांकाळे,अनिता बडाख,भारती वानखेडे,अर्चना आव्हाड, नीता कुलकर्णी,शीतल पोकळे,मंदा गमे,कल्पना चित्ते,योगिता महांकाळे,हिराबाई बर्डे ,लता बर्डे,कुसुम पवार,रविना जाधव,विमल सांगळे ,शीतल खुरुद,कविता दहीटे, आशा महांकाळे, कीर्ती पांढरे,बानो शेख,मनीषा वानखेडे,शीतल पवार जयश्री बनगय्या,लता अहिरे,कावेरी कुलकर्णी,गीता सांगळे , शारदा पवार,राणी पवार सह गावातील महीलंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
श्रीरामपुर पोलीस,महसूल व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 8 दिवसांचे आत महांकाळ वाडगांव गावात दारू बंदी न केल्यास गावातील महिला कोणतीही पूर्वसूचना न देता उग्र आंदोलन करतील असा इशारा निवेदन द्वारे देण्यात आला आहे.




