कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पारनेर:-“शिव पाणंद संघर्षयोद्धा” पुरस्काराने राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचा गौरव.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पारनेर:-“शिव पाणंद संघर्षयोद्धा” पुरस्काराने राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचा गौरव.

अण्णा हजारे यांच्या हस्ते राज्यव्यापी शिव पाणंद जनजागरण यात्रेचा शुभारंभ; शेतरस्त्याच्या लढ्याला नवी दिशा

पारनेर!सुपा (राजकुमार इकडे)
“शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धी” या ध्येयवाक्याने प्रेरित महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने आदर्शगाव राळेगणसिद्धी येथे पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक मा. अण्णा हजारे यांच्या शुभहस्ते राज्यव्यापी “शिव पाणंद शेतरस्ता जनजागरण यात्रा” व पदाधिकारी सन्मान अभियानाचा उत्साहात शुभारंभ झाला. यावेळी राज्यभरातील शेतरस्त्यांच्या लढ्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संघर्षयोद्ध्यांचा “शिव पाणंद संघर्षयोद्धा” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “मा. अण्णा हजारे यांच्या पाठिंब्यामुळे शिव पाणंद शेतरस्ता चळवळीला नवी ऊर्जा मिळाली आहे. ‘मिशन झिरो पेण्डन्सी’च्या माध्यमातून शेतरस्त्यांसाठी संघर्षे करणाऱ्या प्राधाण्याने महाराष्ट्रातील प्रत्येक गरजवंत शेतकऱ्याला हक्काचा, दर्जेदार आणि चिखलमुक्त सिमेंट काँक्रीटचा शेतरस्ता मिळवून देण्यासाठी ही चळवळ अधिक वेगाने पुढे नेली जाईल.”
यावेळी “माझा रस्ता होवो न होवो, पण माझ्या शेवटच्या शेतकरी भावाला दर्जेदार शेतरस्ता मिळेपर्यंत मी थांबणार नाही,” असे ठामपणे सांगत शरद पवळे यांनी चळवळीचा निर्धार व्यक्त केला.कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांसाठी निस्वार्थपणे संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच गावोगावी जाऊन शेतरस्त्याच्या हक्काबाबत जनजागृती करण्याचा आणि प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
राज्याच्या विविध भागांतून आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाने “प्रत्येक शेताला हक्काचा, दर्जेदार आणि चिखलमुक्त शेतरस्ता” या चळवळीच्या ध्येयाला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी शेतरस्त्यांमुळे ग्रामविकास होतो हे राळेगणसिद्धीतून दाखवून दिले त्याचबरोबर शरद पवळे यांच्या सामाजिक कार्यामुळे नारायणगव्हाण राळेगणसिद्धी परिवाराचे नाते घट्ट झाल्याचे सांगितले त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत न्याय देण्याचे आश्वासन दिले त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीही शिव पाणंद चळवळीच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगितले जोरदार पाऊस सुरू असतानाही चळवळीचे पराधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमसाठी आण्णा हजारे यांचे स्वीय सहायक दत्ता आवारी,रामदास सातकर,नाना आवारी यांनी मोलाचे सहकार्य केले यावेळी चळवळीचे शरद पवळे,रविंद्र खुडे,नाथाभाऊ शिंदे,बाळासाहेब थोरात,सुरेश वाळके,विजय शेलार, सचिन शेळके,मनोहर मतकर,आंबादास आव्हाड,पोपट शेळके, शांताराम पानमंद,विठ्ठल निर्मळ,अशोक कचरे, शिवाजी राऊत,राहूल गट,युवराज कानसकर, विजय दळवी,नाना शिंदे,दशरथ वाळूंज, भाऊसाहेब वाळूंज, बबन दाभाडे, शिराज पठाण,दत्तात्रय बांगर,थोरवे आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button