उंदरखेल:-(आष्टी)-पत्रकाराचा अनोखा वाढदिवसः वाढदिवसानिमित्त २१00 झाडे लावून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पत्रकाराचा अनोखा वाढदिवसः वाढदिवसानिमित्त २१00 झाडे लावून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश.

आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आमजेद शेख यांच्या अतिरिक्त खर्चाला फाटा देत वाढदिवस साजरा केला .
वाढदिवस म्हटला की पुप्ष, फेटे ,हार,तुरे, केक कापणे आणि जल्लोष करणे हे समीकरण आता रूढ झाले आहे. मात्र, याला छेद देत उंदरखेल येथील सामाजिक जाणिवा जपणारे पत्रकार आमजेद शेख यांनी आपला वाढदिवस एकविसे विविध प्रकारची झाडे लावून अत्यंत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे.
पत्रकार शेख यांनी प्रत्येकाने एक झाड ला असे आव्हान केले होते तरी शेख यांच्या वर प्रेम करणाऱ्या ने प्रत्येकाने एक झाड लावले आहे.
वाढदिवसाच्या दिवशी होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन त्यांनी स्थानिक परिसराचे मध्ये वृक्षारोपणाचा हा स्तुत्य उपक्रम राबविला. यात वड, पिंपळ, कडुनिंब आणि फळझाडांची लागवड करण्यात आली. केवळ झाडे लावणे नव्हे, तर ही सर्व झाडे जगवण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
या उपक्रमामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव तर झालाच, शिवाय त्यासोबतच एक सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण रक्षणाचा उत्तम संदेश त्यांनी समाजाला दिला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके, पत्रकार कासम शेख,शोकत पठाण,सिराज शेख,माने साहेब ,धुळाजी लकडे, मा.स.राजेद्र दहातोंडे,अँड.नवनाथ शेकडे , तांदळे साहेब,संदीप वामन व मोठ्या प्रमाणात पत्रकार बांधव . सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते




