श्रीरामपूर / माळेवाडी:-फसव्या कर्जमाफी जी.आरची प्रत्येक गावात होळी करणार – औताडे.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

फसव्या कर्जमाफी जी.आरची प्रत्येक गावात होळी करणार – औताडे.

माळेवाडी / श्रीरामपूर
(RPS स्टार न्यूज प्रतिनिधी ) श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली फडणवीस सरकारने फसवणूक केलेल्या जीआरची होळी करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे आपल्या प्रमुख भाषणात म्हणाले की,’
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासित केले होते. परंतु सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांचा सोयीस्कर रित्या विसर पडला असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या नावाने २ जून २०२६ काढलेला जीआर हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा आहे. राज्यातील शेतकऱ्यांची सदर जीआर च्या आधारे प्रचंड फसवणूक झालेली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणणाऱ्या सरकारने सदर जीआर च्या माध्यमातून अप्रत्यक्ष शेतकऱ्यांची वसुली करण्याचा जीआर काढला आहे. वास्तविक स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1980 सालापासून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले परंतु शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पादनात घट झालेली दिवसेन दिवस सिध्द झाले आहे. हरितक्रांतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीला पूर्णविराम देऊन या देशातील जनतेची भूक भागविण्यासाठी ग्रो मोअर जास्त पिकवण्याच्या नादात रासायनिक व यांत्रिक भांडवली शेतीचा अवलंब केला. यातच शेतकऱ्यांचा घात झाला आहे. सेंद्रिय शेती ही स्वावलंबी होती. आज रोजी शेतीसाठी ट्रॅक्टर, ट्रॅक्टर साठी लागणारे डिझेल, अवजारे, रासायनिक खते, बियाणे, तणनाशके, कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके अशा अनेक प्रकारच्या गरजा भागविण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका जिल्हा बँका, पतसंस्था यांच्यासह खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन शेती करावी लागत आहे. परंतु दिवसेंदिवस शेतमालाला मागील गेल्या वीस वर्षापासून उत्पादन खर्च भरून निघेल इतका दर केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे मिळाला नाही. १९८३ मध्ये तत्कालीन काँग्रेसचें मुख्यमंत्री स्व. ए. आर. अंतुले यांनी दहा हजार रुपये पर्यंत ची कर्जमाफी राज्यातील शेतकऱ्यांना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर उदार मनाने दिली होती. सदर कर्जमाफीमध्ये कुठल्याही तारखेची व क्षेत्राची अट नसताना व त्याकाळी शेतीसाठी फक्त भूविकास बँकेसारख्या बँक कर्ज देत होत्या. दुष्काळी परिस्थितीमध्ये पशुपालन जगविण्यासाठी भू विकास बँकेने चारा तगाई म्हणून कर्ज दिले होते सदर दिलेले बहुतांश शेतकऱ्यांचे कर्जे माफ झाले होती. त्यावेळी सोने १२००/- रुपये तोळा होते आज ते १५०,००० /- रुपये तोळा आहे. मागील ४५ वर्षाच्या तुलनेत आज रोजी किमान १२लाख रुपये पर्यंतची सरसकट कर्जमाफी योजना आणणे गरजेचे होते.
परंतु दुर्दैवाने त्यानंतर कुठल्याही सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी व सुखकर जीवन जगण्यासाठी अशा प्रकारची कर्जमुक्ती योजना आणली नाही. आज ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शंभर टक्के शेतीवर आहे अशी कुटुंबे दुर्दैवाने आत्महत्येच्या उंबरठ्यावर आणण्याचे पाप वेळोवेळी त्या -त्या सरकारने केले आहे.फडणवीस सरकारने २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाने निकष अटी व शर्ती लादून कर्जमुक्ती योजना आणली होती. सदर योजनेतही जवळपास सहा लाख शेतकऱ्यांना पाच लाख नऊशे कोटी रुपयांना वंचित राहावे लागले. याबाबत शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालय, छत्रपती संभाजी नगर उच्च न्यायालय व नागपूर उच्च न्यायालय धाव घेऊन न्याय मिळविला परंतु फडणवीस सरकारने मा . ना. उच्च न्यायालयाच्या आदेशालाही केराची टोपली दाखविली. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेल्या तीन-चार वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या एकमेव मागणीसाठी सातत्याने आंदोलने छेडली गेली. सरकारला न्यायालय व लोकशाहीतील आंदोलने याचीही गनिमा राहिलेली नाही. परंतु प्रत्येक जन आंदोलनामध्ये सरकारची व सरकार मधील नेत्यांची प्रतिमा ही मलिन होत असते याबाबतचे भानही नेत्यांना राहिलेले नाही. तरी फडणवीस सरकारने वचननाम्यातील वचनपूर्ती करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वातंत्र्याचा आनंद मिळवून देण्यासाठीव शेतकऱ्यांचे जीवन सुखकर होनेसाठी क्षेत्राची रकमेची व तारखेची अट न लावता सातबारा कोरा करावा. अन्यथा याबाबत जनजागृती करण्यासाठी ३० जून २०२६ पर्यंत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गाव तेथे कर्जमुक्ती योजनेच्या फसव्या जीआरची होळी करण्यात येईल. १ जुलै २०२६ पासून शेतकरी संघटना शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही जिल्हाध्यक्ष औताडे यांनी दिला.
यावेळी शेतकरी संघटनेच्या माळेवाडी शाखेचे शाखाध्यक्ष दिलीप औताडे, उपाध्यक्ष शैलेश वमने शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ सहकारी सोसायटी चेअरमन दिलीपतात्या औताडे, साहेबराव चोरमल, महांकाळ वाडगाव शाखेचे शाखा अध्यक्ष कडू पवार, सतीश नाईक, दिगंबर औताडे, ग्रा.पं.स. जालिंदर औताडे, ग्रा.पं.स.बाबासाहेब औताडे, देविदास वमने, दादासाहेब जाधव, योगेश वमने, बबन औताडे, सिताराम औताडे, सोसायटी सदस्य भरत वमने ग्रा.प.स.प्रकाश ढोबळे, विलास औताडे बाबसाहेब औताडे (सराला), राजाराम औताडे, विलास गोरे, सतीश गायकवाड, कृष्णा औताडे, कल्यान बहिरट,दिलीप सरोदे सोन्याबापू औताडे बाबसाहेब(बंडू )औताडे,दगू मोहन, राधूजी मोहन, सुनिल पवार, बाळासाहेब निकम, किशोर मोहन व ज्येष्ठ शेतकरी हरिभाऊ ताके सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.




