क्राईम न्युजताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

श्रीरामपूरच्या भूमिपुत्र API अभिजीत देशमुख यांचा मुंबईत ‘गौरव’! – करोडोंच्या ऑनलाइन फसवणुकीचा छडा लावत आरोपींना बेड्या; पोलीस आयुक्तांकडून प्रशंसापत्र देऊन सन्मान.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीरामपूरच्या भूमिपुत्र API अभिजीत देशमुख यांचा मुंबईत ‘गौरव’! – करोडोंच्या ऑनलाइन फसवणुकीचा छडा लावत आरोपींना बेड्या; पोलीस आयुक्तांकडून प्रशंसापत्र देऊन सन्मान.

श्रीरामपूर | RPS स्टार न्यूज प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्दचे भूमिपुत्र आणि सध्या मुंबईतील डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले API अभिजीत अजितराव देशमुख यांनी ऑनलाइन फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्याचा शिताफीने तपास करून आरोपींना अटक करत गुन्ह्याचा छडा लावला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत मुंबई शहराचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते त्यांना प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले.
डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 1003/2026 मधील ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करताना API अभिजीत देशमुख यांनी तपासाची सूत्रे अत्यंत कौशल्याने हाताळली. तांत्रिक तपास, उपलब्ध माहितीचे बारकाईने विश्लेषण आणि आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेत त्यांनी या प्रकरणातील आरोपींना शिताफीने अटक केली.
ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना अशा गुन्ह्यांचा तपास करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. या पार्श्वभूमीवर API देशमुख यांनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली आहे.
पोलीस आयुक्तांकडून कौतुकाची थाप
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत मुंबई शहराचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी API अभिजीत देशमुख यांना प्रशंसापत्र देऊन गौरविले. त्यांच्या तपास कौशल्याचे आणि कर्तव्यनिष्ठेचे यावेळी कौतुक करण्यात आले.
API अभिजीत देशमुख हे श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द गावचे भूमिपुत्र असल्याने त्यांच्या या यशामुळे बेलापूर खुर्दसह संपूर्ण श्रीरामपूर तालुका आणि पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.
भूमिपुत्राच्या यशाने बेलापूर पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण
पोलीस दलात कार्यरत असताना गुन्ह्यांचा छडा लावताना दाखविलेली कार्यतत्परता, तपासातील बारकावे आणि कर्तव्याप्रती असलेली निष्ठा यामुळे API अभिजीत देशमुख यांनी आपल्या गावाचे आणि तालुक्याचे नाव मुंबईत उज्ज्वल केले आहे.
त्यांच्या या सन्मानाबद्दल बेलापूर पंचक्रोशीतील नागरिक, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“भूमिपुत्राच्या कर्तृत्वाला मुंबईची दाद; ऑनलाइन फसवणुकीचा छडा लावत API अभिजीत देशमुख यांची दमदार कामगिरी!”
त्यांच्या पुढील सेवेसाठी आणि उज्ज्वल कारकिर्दीसाठी बेलापूर खुर्द व श्रीरामपूर तालुक्यातून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button