आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

परेल:-(मुंबई)-रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व महेश्वर भिकाजी तेटांबे यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त दिग्गजांची उपस्थिती.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

परेल:-(मुंबई)-रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व महेश्वर भिकाजी तेटांबे यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त दिग्गजांची उपस्थिती.

मुंबई (परेल, प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) :
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व कलाविश्वातील एकोपा आणि आपुलकीचे व्यासपीठ ठरलेल्या परेल येथील ‘लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओ’ मध्ये, रंगभूमी व चित्रपट सृष्टीतील हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व, प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्भीड पत्रकार महेश्वर भिकाजी तेटांबे यांचा ५५ वा वाढदिवस अत्यंत उत्साही, मंगलमय आणि भारदस्त वातावरणात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. कला आणि संगीताच्या सुरावटीत रंगलेल्या या सोहळ्याला समस्त गायक, अभिनेते, तंत्रज्ञ आणि क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी सपरिवार उपस्थिती दर्शवून महेश्वरजींवर शुभेच्छांचा वर्षाव केला. या भव्यदिव्य वाढदिवसाच्या आयोजनामध्ये लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओचे सर्वेसर्वा व ‘वॉईस ऑफ मुकेश’ श्री. रामजी डोडीया, सौ. लक्ष्मी डोडीया, कार्यकारी निर्माते तथा साऊंड इंजिनिअर काफिल अन्सारी, प्रसिद्ध गायक तथा समाजसेवक डॉ. मंगेश पेडामकर, निलेश घाडी आणि प्रसिद्ध गायिका रुची पाटील यांचे मोलाचे व प्रेरणादायी सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत भावूक आणि मांगल्याच्या वातावरणात झाली. उपस्थित सर्व स्नेही व गायक मित्रांनी महेश्वरजींचे औक्षण केले. त्यानंतर महेश्वरजींच्या सुहद्हस्ताने केक कापण्यात आला आणि “आयुष्याची ५५ वर्षे आनंदाने आणि कर्तृत्वाने पूर्ण झाली,” याची साक्ष या सोहळ्याने दिली. उपस्थितांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आपुलकी यावरून महेश्वरजींच्या सामाजिक आणि कलात्मक लोकप्रियतेची प्रचिती येत होती. वाढदिवसाच्या या शुभ सायंकाळी संगीतप्रेमींनी एकापेक्षा एक सरस गीतांची जुगलबंदी सादर केली. शैलु पुजारी, विनोदभाऊ, छोटे उस्ताद वरद वाघमारे, संगीता साकरे, रुची पाटील, निशाताई पाखरे, पूजा वाघमारे, लता सासवडकर, नेहा, पांडुरंग भाऊ, बाबू भाऊ, शरद तावडे, दत्ता वाघमारे, विजय सातपुते, आबा पवार, काफिल अन्सारी, कांतीलाल भाई, मोहन मोरे, डॉ. मंगेश पेडामकर, रामजी दादा, निलेश घाडी, नवनाथ सर आणि दिनेश सोलंकी या नामांकित गायकांनी दिलखुलास गीत गायनाचा अनोखा आनंद लुटत उपस्थितांची मने जिंकली. सुरेल गाण्यांच्या सुरांनी संपूर्ण स्टुडिओ परिसर दुमदुमून गेला होता. या विशेष सोहळ्याला बॉलिवूडचे लोकप्रिय विनोदी अभिनेते कांचन पगारे यांच्यासह समस्त तेटांबे परिवार, गुरव परिवार, देवेंद्र पेडणेकर, तुषार भाऊ, मांजरेकर भाऊ, वरळी विभागीय प्रवक्ते श्री मकरंद तासगांवकर परिवार, अभिनेते,दिग्दर्शक अविनाश राऊत आणि साकरे परिवार यांनी विशेष उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच काही विशेष कारणांसाठी येऊ न शकलेले पण व्हिडिओ कॉल मार्फत शुभेच्छा देणारे सचिन परब, हसमुख सोलंकी शारदा मॅडम, अशोक आणि अर्चना ताई वेलकर यांचेही मोलाचे आशीर्वाद लाभले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात म्हणजेच अंतिम टप्प्यात सर्व उपस्थितांसाठी एका स्नेहभोजनाचा सुंदर बेत आखण्यात आला होता, ज्याचा आस्वाद सर्वांनी घेतला. कार्यक्रमाची सांगता करताना महेश्वर भिकाजी तेटांबे यांनी अत्यंत कृतज्ञ भावनेने आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी उपस्थित सर्व गायक मित्र-मैत्रिणी, लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओचे मालक-चालक श्री. रामजी डोडीया, लक्ष्मी भाभी, काफिल अन्सारी तसेच उपस्थित सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ मान्यवरांचे मनापासून आभार मानले. अशा तऱ्हेने कला, साहित्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात अविरत सेवा देणाऱ्या महेश्वर भिकाजी तेटांबे यांचा हा ५५ वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button