खटाव:-मायणी येथे ऑगस्ट क्रांती दिनी दिवंगत स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

खटाव:-मायणी येथे ऑगस्ट क्रांती दिनी दिवंगत स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन.
“क्रांतीवीरांच्या त्यागाला मानाचा मुजरा! मायणीतील स्मृतिस्तंभावर पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींना अभिवादन”
मायणी प्रतिनिधी :
९ ऑगस्ट ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मायणी येथील गांधी मैदानावर असलेल्या दिवंगत स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतिस्तंभास पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला अभिवादन करण्यात आले.
जिल्हा परिषद सदस्य सूरज पाटील व सकल मराठा सेवक विलास सोमदे यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतिस्तंभास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सूरज पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचे स्मरण केले. डॉ. विकास देशमुख, दीपक कणसे, रामभाऊ सोमदे, कृष्णात सोमदे, प्रकाश कणसे, पांडुरंग तारळेकर, सुदाम भिसे, जनार्दन देशमुख, अरुणराव चोथे, द. ग. माने, विराज कणसे यांनीही स्मृतिस्तंभास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपस्थितांनी “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” अशा घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला. स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष, त्याग आणि बलिदान भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.






