ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-सटालेवाडीच्या संग्राम कदम यांची राष्ट्रवादी युवक संघटनेत मोठी झेप; सातारा जिल्हा युवक उपाध्यक्षपदी नियुक्ती!

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-सटालेवाडीच्या संग्राम कदम यांची राष्ट्रवादी युवक संघटनेत मोठी झेप; सातारा जिल्हा युवक उपाध्यक्षपदी नियुक्ती!

सातारा |
वाई दि. ३१ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सातारा जिल्हा युवक उपाध्यक्षपदी सटालेवाडी (ता. वाई) येथील युवा व धडाडीचे कार्यकर्ते संग्राम शिवाजी कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
दिनांक २४ मे २०२६ रोजी झालेल्या कार्यक्रमास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे प्रमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी युवक कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा आणि धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
नियुक्तीनंतर बोलताना संग्राम कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण आणि शरदचंद्र पवार यांच्या पुरोगामी विचारांवर चालत युवक, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची ग्वाही दिली.
तसेच जिल्ह्यातील अधिकाधिक युवकांना पक्षाशी जोडून संघटना बळकट करण्यासाठी काम करणार असून पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संग्राम कदम यांच्या नियुक्तीचे सातारा जिल्हा आणि वाई तालुक्यातील राजकीय, सामाजिक तसेच युवक वर्गातून मोठ्या उत्साहात स्वागत होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button