क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-कराडमध्ये ड्रग्ज माफियांवर पोलिसांचा घणाघात! ‘एमडी’सह १८.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त; ३ तस्कर गजाआड.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कराडमध्ये ड्रग्ज माफियांवर पोलिसांचा घणाघात! ‘एमडी’सह १८.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त; ३ तस्कर गजाआड.

कराड प्रतिनिधी |
कराड शहर पोलिसांनी अमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर जोरदार प्रहार करत ‘एमडी’ ड्रग्जच्या तस्करीचे रॅकेट उघडकीस आणले आहे. वारुंजी फाटा परिसरात रचलेल्या सापळ्यात ९५.७८ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले असून तीन तस्करांना अटक करण्यात आली आहे. या धडक कारवाईत १८ लाख ८२ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
गुप्त माहितीच्या आधारे कराड शहर पोलिसांनी इनोव्हा कारमधून ड्रग्ज विक्रीसाठी येणाऱ्या संशयितांवर छापा टाकला. कारवाईदरम्यान समीर गुलाब शेख, नजर महम्मद आरिफ मुल्ला आणि फरदीन दादापीर शेख यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून २ लाख ८७ हजार ३४० रुपये किमतीचे ९५.७८ ग्रॅम एमडी, तीन मोबाईल फोन आणि एक इनोव्हा कार जप्त करण्यात आली. या प्रकरणामुळे कराड परिसरात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या काळ्या साम्राज्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. आरोपींच्या मागे आणखी कोणते मोठे जाळे कार्यरत आहे का, याचा तपास सुरू असून ड्रग्ज माफियांचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“ड्रग्जच्या विळख्यात तरुणाईला ओढणाऱ्यांवर पोलिसांचा थेट वार; कराडमध्ये तस्करांचे धाबे दणाणले!”

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button