वाई:-शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले; शिवाजीराव ढमाळ यांचे निधन.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले; शिवाजीराव ढमाळ यांचे निधन.

वाई दि. २७ :- ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष चंद्रकांत ढमाळ यांचे वडील तथा सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजीराव हनुमंतराव उर्फ बापू ढमाळ (वय ९२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
शिवाजीराव ढमाळ यांनी जिल्हा परिषदेत शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्य करत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. खंडाळा तालुक्यातील आसवली येथील संत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच श्री जन्नीदेवी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी मोलाची जबाबदारी सांभाळली.
लोकसहभागातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यल्प खर्चात दहावीपर्यंतचे वसतिगृह सुरू ठेवण्याचे कार्य त्यांनी अनेक वर्षे प्रामाणिकपणे केले. त्यांच्या या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन घडले.
त्यांच्यावर आसवली येथील स्मशानभूमीत मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आयोजित शोकसभेत जिजाबा पवार, दत्तानाना ढसाळ, चंद्रकांत ढमाळ, अतुल पवार, अनिरुद्ध गाढवे, घाडगे गुरुजी, काकडे गुरुजी, जंगम गुरुजी आदींनी श्रद्धांजली वाहिली.
यावेळी मिलींददादा पाटील, ऋषिकेश धायगुडे, शंकरराव गाढवे सर, रतनसिंह शिंदे, रत्नकांत भोसले, लक्ष्मण चव्हाण, ज्ञानदीप संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




