नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील नेत्रचिकित्स डॉक्टरांच्या मागणीला अखेर यश.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील नेत्रचिकित्स डॉक्टरांच्या मागणीला अखेर यश.

सातारा :-नागठाणे परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची व दिलासादायक बातमी समोर आली आहे. नागठाणे पंचायत समिती विद्यमान सदस्य श्री.संतोष लक्ष्मण साळुंखे यांनी एक महिन्यापूर्वी नागठाणे आरोग्य केंद्रास सदिच्छा भेट दिली असता आरोग्य केंद्रात नियमित येणारे नेत्र चिकित्सा तपासणी डॉक्टर येत नसल्याचे दिसून आल्याने पंचायत समिती सदस्य यांनी THO डॉ.श्री.जाधव साहेब यांच्याशी संवाद साधून *नेत्र चिकिस्त डॉक्टर दर मंगळवारी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत* पूर्ववत रुजू हव्वे यासाठी प्रयत्न केल्याने अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेत्र चिकित्सक डॉक्टर नियुक्त करण्याच्या मागणीला अखेर यश आले आहे. तसेच ग्रामपंचायत माजी सदस्य, शिक्षण क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक श्री.दिपक शिर्के सर,युवा नेते श्री.समीर साळुंखे PAC व्यवस्थापक , कर्मचारी, स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने या मागणीची दखल घेत सकारात्मक निर्णय घेतला.
यामुळे आता नागठाणे व परिसरातील रुग्णांना डोळ्यांच्या तपासणीसाठी दूरवर जाण्याची गरज भासणार नाही. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या सेवेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातच नेत्र तपासणी, उपचार व मार्गदर्शन उपलब्ध होणार असल्याने आरोग्य सेवेमध्ये मोठी सुधारणा होणार आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानत हा निर्णय जनतेच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याची भावना व्यक्त केली. तसेच भविष्यातही नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.




