कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-‘एकरी 100 टन ऊस’ शक्य! योग्य नियोजनच ठरते यशाची गुरुकिल्ली – अजय शेंडे यांचा ठाम विश्वास.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

‘एकरी 100 टन ऊस’ शक्य! योग्य नियोजनच ठरते यशाची गुरुकिल्ली – अजय शेंडे यांचा ठाम विश्वास.

वाई प्रतिनिधी :
योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि अचूक खत व कीड-रोग व्यवस्थापन केल्यास ऊस पिकाचे एकरी तब्बल 100 टन उत्पादन घेणे शक्य आहे, असा विश्वास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजय शेंडे यांनी व्यक्त केला.
मौजे कळंभे येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि झायडेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऊस पीक परिसंवादात ते बोलत होते.
या वेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेंडे यांनी गटशेती व नैसर्गिक शेतीवर भर देण्याचे आवाहन केले. पारंपारिक पद्धतीऐवजी आधुनिक लागवड तंत्रज्ञान आणि ठिबक सिंचनाचा वापर वाढवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुरेश माने पाटील (माजी शास्त्रज्ञ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट) उपस्थित होते. त्यांनी ऊस बेणे निवड, बेणे प्रक्रिया, सेंद्रिय कर्ब वाढ, खत व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण आणि तण व्यवस्थापन या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधानही त्यांनी केले.
प्रवीण माने (झायडेक्स कृषी तज्ञ) यांनी कंपनीच्या उत्पादनांची माहिती देत त्यांचा योग्य वापर कसा करावा हे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कुमार बरकडे यांनी केले, तर हरीचंद्र धुमाळ यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती देत शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
सूत्रसंचालन निखिल मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रवींद्र बेलदार यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन तानाजी यमगर, ग्रामपंचायत कळंभे आणि झायडेक्स इंडस्ट्रीज यांनी केले.
यावेळी निखिल रायकर, राहुल शेडगे, सुशांत पाटील, सरपंच नीलम शिवथरे, सोसायटी चेअरमन यशवंत शिवथरे यांच्यासह ग्रामस्थ, कृषी अधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button