आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कालगाव:-(कराड)-“जिद्द, मेहनत आणि कुटुंबाच्या पाठबळावर कालगावचा सुपुत्र बनला प्रशासकीय अधिकारी!”

पत्रकार सुशीलकुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“जिद्द, मेहनत आणि कुटुंबाच्या पाठबळावर कालगावचा सुपुत्र बनला प्रशासकीय अधिकारी!”

 तालुका प्रतिनिधी सुशील कुमार पुजारी

कराड तालुक्यातील कालगावचे सुपुत्र मा. प्रशांत सुभाष जाधव यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) सार्वजनिक आरोग्य विभागात प्रशासकीय अधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
प्रशांत जाधव यांनी २०२३ मध्ये ही स्पर्धा परीक्षा दिली होती. सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले. या यशामागे त्यांचे कुटुंबीय, विशेषतः आई, बहीण, पत्नी तसेच मित्रपरिवार यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी मनोगतात सांगितले.
यावेळी त्यांनी गावातील तरुण मुला-मुलींनी देखील एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून मोठे अधिकारी व्हावे, असा संदेश दिला. तसेच इच्छुक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
कार्यक्रमात गावचे सरपंच सोमनाथ भाऊ चव्हाण यांनी प्रशांत जाधव यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “गावातील युवकांनी मोठी स्वप्ने पाहून स्पर्धा परीक्षा द्याव्यात. अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही कायम उभे राहू. कोणतीही मदत लागल्यास ग्रामपंचायत सदैव सहकार्य करेल.”
या सत्कार समारंभाला विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सतीश चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य जयवंत बापू चव्हाण, अण्णा पाटील, कृष्णत चव्हाण, सत्यवान चव्हाण, राजेंद्र सरनोबत, अमरेश चव्हाण, प्रवीण कुलकर्णी, मंगेश भोसले, भरत माने, अमोल चव्हाण, अनिकेत चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती कराडचे संचालक राजेंद्र रमेश चव्हाण, संदीप चव्हाण, रमेश यादव, सागर चव्हाण, दिलीप दादा चव्हाण, अरुण कुलकर्णी, अशोक सावंत सर, अधिक भोसले, राजेंद्र विलास चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशांत जाधव यांच्या यशामुळे कालगावातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button