पुसेसावळी:-जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सुरेश सर्वगोड सरांचा यशवंत नगर शाळेत गौरव.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सुरेश सर्वगोड सरांचा यशवंत नगर शाळेत गौरव.

पुसेसावळी :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, यशवंत नगर येथे आदरणीय श्री. सुरेश सर्वगोड सर यांना कास्ट्राईब शिक्षक व मित्र संघटना यांच्या वतीने प्रदान करण्यात आलेल्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराबद्दल विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
यावेळी कळंबी केंद्र समूहाचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री. धनाजी पवार यांच्या हस्ते श्री. सर्वगोड सर यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी कळंबी केंद्रातील सर्व शिक्षकांनी श्री. सुरेश सर्वगोड सर यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्कार समारंभास मांडवेशिवार शाळेचे उपशिक्षक श्री. राऊत सर, सौ. लता कदम मॅडम, श्री. सावळेश्वर राऊत तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री. सर्वगोड सर यांच्या कार्याचा गौरव करत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या योगदानाचे विशेष कौतुक केले.




