श्रीगोंदा : राजदीप जिनिंग प्लांटला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान!
पत्रकार राधाजी व्यवहारे श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) श्रीगोंदा : राजदीप जिनिंग प्लांटला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान!

जुना बेलवंडी कोठार रोड, श्रीगोंदा शहर
आज पहाटे श्रीगोंदा शहरातील जुन्या बेलवंडी कोठार रोडलगत असलेल्या राजदीप जिनिंग प्लांटला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत जिनिंग प्लांटमधील निर्यातीसाठी तयार असलेला मोठ्या प्रमाणावरील कापूस जळून खाक झाला असून, कंपनीचे जवळपास ४ ते ५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
राजदीप जिनिंग प्लांटचे मालक दिपकशेठ भंडारी, गौरव शेठ मेहता, गौरव शेठ पोखरणा, मयूर शेठ बोरा, नवनीत शेठ मुनोत, संदीप शेठ गुगळे व इतर व्यावसायिक भागीदार यांच्या माध्यमातून हा कापूस खरेदी-विक्री व प्रक्रिया उद्योग सुरू होता. अचानक लागलेल्या आगीमुळे या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
आज या दुर्घटनाग्रस्त जिनिंग प्लांटची लोकनेते, माजी मंत्री श्री. बबनरावजी पाचपुते साहेब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी शहरातील मोठ्या संख्येने व्यापारी, व्यावसायिक बांधव, नगरपरिषदेचे नगरसेवक तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पाचपुते साहेबांनी नुकसानग्रस्त व्यापारी बांधवांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. “या कठीण प्रसंगी आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही,” असा विश्वास त्यांनी सर्व व्यापारी बांधवांना दिला.
व्यापारी बांधवांवर ओढवलेल्या या संकटात त्यांना आधार देत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका लोकनेते बबनरावजी पाचपुते साहेब यांनी घेतली.
या दुर्घटनेतील सर्व नुकसानग्रस्त व्यापारी बांधवांना या संकटातून लवकर सावरण्याचे बळ मिळो, हीच सदिच्छा…..
2) श्रीगोंदा : श्रीगोंदा न्यायालयातील कर्मचारी बेमुदत संपावर.

समान काम, समान वेतन आणि सुधारित वेतनश्रेणीच्या मागणीसाठी राज्यातील ३४ हजार दुय्यम न्यायालयीन कर्मचारी दि. १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर गेले आहेत.
त्यामुळे श्रीगोंदा न्यायालयातील कामकाज ठप्प झाले आहे. उच्च न्यायालयाच्या धर्तीवर वेतन मिळावे, ही कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे.
या आंदोलनाला श्रीगोंदा वकील संघानेही पाठिंबा दिला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.



