कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई:-“किमान वेतन कायद्याची ‘वाई’त ऐशीतैशी! कामगारांच्या घामावर कामगार अधिकारी आणि मालकांचा डल्ला?” ‘साटेलोटे जोरवर कामगार मात्र वाऱ्यावर’.?
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-“किमान वेतन कायद्याची ‘वाई’त ऐशीतैशी! कामगारांच्या घामावर कामगार अधिकारी आणि मालकांचा डल्ला?” ‘साटेलोटे जोरवर कामगार मात्र वाऱ्यावर’.?
सातारा वाई.प्रतिनिधी.
वाई तालुक्यात किमान वेतन कायद्याचा बोजवारा; कामगार अधिकारी आणि मालकांच्या साठ्यालोट्यामुळे कामगार वर्गात तीव्र असंतोष!
वाई तालुका आणि शहरात मोठ्या प्रमाणावर व्यापारी, औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील आस्थापना विस्तारत आहेत. मात्र, या चकाकीमागे राबणाऱ्या कष्टकरी कामगारांच्या नशिबी मात्र अंधारच असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. शासनाने ठरवून दिलेले किमान वेतन (Minimum Wage) देण्यास वाईतील बहुतांश आस्थापना मालकांनी ठेंगा दाखवला असून, या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करणाऱ्या सातारा कामगार अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मालक वर्ग आणि कामगार अधिकारी यांच्यातील ‘साठ्यालोट्या’मुळेच कामगारांची ही उघड पिळवणूक सुरू असल्याची चर्चा आता तालुक्यात रंगू लागली आहे.
कायद्याला हरताळ,आर्थिक पिळवणूक सुरू
शासकीय नियमांनुसार, कोणत्याही खासगी दुकान, हॉटेल,कापड शोरूम, पेट्रोल पंप, दवाखाने, कंपनी प्रोडक्स वितरक, तसेच इतर ठिकाणी व कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराला ठराविक किमान वेतन, कामगार सोई सुविधा, निश्चित कामाचे तास आणि इतर भत्ते मिळणे बंधनकारक आहे. मात्र,वाई शहरात कामगारांना तब्बल १०-१२ तास राबवून घेतले जात असून, मोबदला मात्र अत्यंत तुटपुंजा दिला जात आहे.महागाईच्या या काळात कामगारांना मिळणारे वेतन पाहता,”कष्ट जास्त आणि दाम कमी”अशी त्यांची अवस्था झाली आहे.
अधिकारी नेमके करतात काय?
नियमबाह्य काम करून घेणाऱ्या अशा आस्थापनांवर कारवाई करण्याची कायदेशीर जबाबदारी कामगार विभागाची (Labour Department) आहे. वेळोवेळी आस्थापनांची तपासणी करणे, कामगारांचे हजेरी पट आणि वेतन पत्रक तपासणे अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. परंतु, वाई तालुक्यात कामगार अधिकारी केवळ ‘नियतकालिक भेटी’ (Visits) देतात आणि मालकांकडून खिसे गरम करून निघून जातात, असा थेट आरोप त्रस्त कामगारांमधून होत आहे. अधिकाऱ्यांच्या याच मूक संमतीमुळे मालक वर्गाचे धाडस अधिकच वाढले आहे.
तक्रार केल्यास कामावरून काढण्याची धमकी दबाव तंत्रचा वापर करणे शारीरिक मानसिक त्रास देणे.असे प्रकार होत आहेत.
अनेक कामगारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, “जर आम्ही किमान वेतनाची किंवा हक्कांची भाषा केली, तर आम्हाला थेट कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. जाणूनबुजून शारीरिक मानसिक त्रास दिला जातो.कामगार अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही काहीही फायदा होत नाही, कारण अधिकारी उलट मालकालाच पूर्वकल्पना देतात.” यामुळे ‘अंधेर नगरी चौपट राजा’ अशी परिस्थिती वाईतील कामगार विश्वात निर्माण झाली आहे.
शहरातील वाढत्या महागाईच्या तुलनेत मिळणारे वेतन अत्यंत नगण्य असल्याने अनेक कामगार कुटुंबे कर्जबाजारी झाली आहेत. कामगार विभागाने तात्काळ वाईतील सर्व लहान-मोठ्या आस्थापनांची कसून चौकशी करावी आणि दोषी आस्थापनाधारक यांचेवर गुन्हे दाखल करावेत, कामगारांना न्याय मिळवून द्यावा.अशी मागणी कामगार वर्गाकडून करण्यात येत आहे.




