बोरिवली:-भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात जनआक्रोश!
पत्रकार विजय काळे महाराष्ट्र राज्य सचिव

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

बोरिवली:-भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात जनआक्रोश!

३० वर्षांच्या कराराने रुग्णालय खासगी संस्थेच्या घशात घालण्याचा डाव हाणून पाडणार – आदित्य ठाकरे यांचा सरकारला इशारा!
मुंबई | प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेने सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यसेवेसाठी उभारलेले बोरिवली (पश्चिम) येथील अत्याधुनिक भगवती मल्टी-स्पेशालिटी रुग्णालय तब्बल ३० वर्षांच्या करारावर खासगी संस्थेच्या ताब्यात देण्याच्या निर्णयाविरोधात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप-महायुती सरकारच्या या कथित खासगीकरणाच्या डावाविरोधात आज भगवती रुग्णालय परिसरात जोरदार जनआंदोलन पुकारण्यात आले.
या जनआंदोलनात युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते व आमदार मा. श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांनी सहभागी होत रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात ठाम भूमिका मांडली. सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे हा त्यांचा हक्क असून, सार्वजनिक आरोग्यव्यवस्था खासगीकरणाच्या माध्यमातून खासगी संस्थांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा निर्धार यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
या आंदोलनात शिवसेना नेते आमदार अनिल परब, शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू, उपनेते विनोद घोसाळकर, माजी आमदार विलास पोतनीस, मनसे नेते संदीप देशपांडे, मनसे सरचिटणीस नयन कदम, विभागप्रमुख उदेश पाटेकर, संतोष राणे, महिला विभाग संघटक शुभदा शिंदे, मनाली चौकीदार यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, शिवसैनिक, मनसैनिक आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.
भगवती रुग्णालय हे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचा आधार असून, त्याचे खासगीकरण न करता ते पूर्ण क्षमतेने जनतेच्या सेवेसाठी सुरू ठेवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रुग्णालयाच्या खासगीकरणाचा निर्णय मागे घेण्यासाठी जनतेचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
RPS STAR NEWS | मुंबई



