आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पारनेर:-MSME उद्योजकांसाठी सेंट्रल बँकेचा विशेष कर्ज मेळावा!

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) पारनेर:-MSME उद्योजकांसाठी सेंट्रल बँकेचा विशेष कर्ज मेळावा!

२० नोव्हेंबरला आयोजन; आकर्षक व्याजदर, जलद कर्जमंजुरीसह विविध योजनांचा लाभ.

सुपा, पारनेर (राजकुमार इकडे)

लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना आर्थिक बळ देऊन व्यवसायवाढीला चालना देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने २० नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष MSME क्रेडिट आऊटरीच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात उद्योजकांना आकर्षक व्याजदर, कमी प्रक्रिया शुल्क, जलद कर्जमंजुरी आणि सुलभ कर्जप्रक्रियेची माहिती मिळणार आहे. तसेच मॉर्गेज बिझनेस लोन, कॉन्ट्रॅक्टर लोन, इंजिनिअरिंग लोन, हॉटेल लोन, ऊर्जा कार्यक्षमता कर्ज, वाहन व्यवसाय कर्ज, GST कर्ज अशा विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे.

व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणारे उद्योजक, व्यावसायिक आणि नवउद्योजक यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे. तज्ज्ञांकडून मार्गदर्शन आणि व्यवसायाच्या गरजेनुसार आर्थिक उपाययोजनाही सुचविण्यात येणार आहेत.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अहिल्यानगर क्षेत्राचे विभागीय प्रमुख श्री. नरेश कुमार दुबे यांनी दि, 20 नोव्हेंबर 2026 रोजी अहिल्यानगर येथे उद्योजकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
उद्योजकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

2) सुपा:-आठ दिवसांपासून राजणगाव मशिद अंधारात! महावितरणच्या गलथान कारभाराने शेतकरी त्रस्त; चोरट्यांना मोकळे रान.

सुपा, पारनेर, अहिल्यानगर (राजकुमार इकडे)
सुपा पंचक्रोशीतील वीजपुरवठा विस्कळीत; पाणी, पशुधन आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न
पारनेर तालुक्यातील सुपा पंचक्रोशीतील राजणगाव मशिद परिसरात महावितरणच्या गलथान कारभारामुळे गेल्या आठ दिवसांपासून आजतागायत रात्रीचा वीजपुरवठा खंडित आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीजदेखील उपलब्ध होत नसल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गाला बसत आहे.

एकीकडे रात्रीच्या वेळी चोरी आणि घरफोड्यांच्या घटनांची भीती वाढली आहे. पोलिस यंत्रणेकडून शेतकरी वर्गाला सावध राहण्याचा इशारा दिला जात असताना, दुसरीकडे परिसरात रात्रीची वीजच नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांचे धाडस वाढण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

दुसरीकडे पावसाने पाठ फिरवल्याने पाण्याचे संकट गंभीर बनले आहे. पिकांना पाणी द्यायचे कसे, जनावरांची तहान भागवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने सांभाळलेल्या गायी, म्हशी, शेळ्या आणि मेंढ्यांचे पालनपोषण करणेही कठीण झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू असल्याने शेतकऱ्यांचे जगणेच अवघड झाले आहे.

शेतकऱ्यांनी शेती करायची, जनावरे जगवायची की रात्री स्वतःच्या घराची सुरक्षा करायची? असा संतप्त सवाल परिसरातील शेतकरी उपस्थित करत आहेत.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन राजणगाव मशिद परिसरातील रात्रीचा सिंगल फेज वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गातून होत आहे.

वीजपुरवठा सुरळीत करणे ही महावितरणची जबाबदारी असताना आठ दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य कायम का? शेतकऱ्यांच्या अडचणींकडे महावितरणचे अधिकारी आणखी किती दिवस दुर्लक्ष करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

महावितरणच्या कारभाराने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये; अन्यथा या प्रश्नावर शेतकरी रस्त्यावर उतरल्यास त्याला जबाबदार कोण? असे राजणगावचे समाज सेवक, व कार्यकर्ते संपत कदम यानी विद्युत महावितणाला लेखी निवेदनात म्हटले आहे

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button