आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भुसावळ:-विचारांचा दीप उजळला! सत्यवान मंडलिक यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ बहाल.

पत्रकार सारिका गवते

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) विचारांचा दीप उजळला!
सत्यवान मंडलिक यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ बहाल.

भुसावळ येथे आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ लेखक कवी डी. एस. घोडेस्वार यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित आशादीप राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार सोहळा २०२६ उत्साहात पार पडला. या प्रतिष्ठित सोहळ्यात कवी-लेखक सत्यवान मंडलिक यांना त्यांच्या ‘स्वातंत्र्याची ७५ वर्षे’ या वैचारिक लेखसंग्रहासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी, समीक्षक प्रा. डॉ. वा. ना. आंधळे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. मंडलिक यांनी कविता, कथा, कादंबरी आणि वैचारिक लेखन अशा विविध साहित्यप्रकारांत उल्लेखनीय कार्य केले असून, त्यांच्या लेखनाला यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे ‘स्वातंत्र्याची ७५ वर्षे’ या साहित्यकृतीला राष्ट्रीय पुरस्कारासह एकूण नऊ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
यावेळी अध्यक्ष प्रा. डॉ. आंधळे व प्रवीण कांबळे यांनी दिवंगत कवी डी. एस. घोडेस्वार यांच्या साहित्यिक योगदानाचा वेध घेत, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भारत सातपुते यांनीही मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक घोडेस्वार यांच्या कन्या, कवयित्री-लेखिका प्रज्ञा बागुल यांनी केले. या सोहळ्याचे आयोजन प्रज्ञा बागुल, हंसराज बागुल आणि घोडेस्वार परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते. सूत्रसंचालन कविता मोरवणकर यांनी आपल्या खास शैलीत रंगतदार पद्धतीने केले.

2) वाई:-शेंदुरजणे दणाणणार! – संयुक्त जयंती महोत्सव २०२६चा चार दिवसांचा भव्य जल्लोष.

वाई, दि. ०१ : शेंदुरजणे (ता. वाई) येथे सामाजिक ऐक्य, परिवर्तनवादी विचार आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम घडवणारा “संयुक्त जयंती महोत्सव २०२६” यंदा अभूतपूर्व उत्साहात साजरा होत आहे. गौतम बुद्ध, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींच्या जयंतीनिमित्त हा महोत्सव प्रेरणादायी ठरत आहे.
पहिला दिवस – अध्यात्मिक सुरुवात आणि भव्य मिरवणूक
शुक्रवार, दि. १ मे रोजी पहाटे ०५:३० ते ०७:०० ध्यान साधनेने दिवसाची सुरुवात होणार असून सकाळी ०९:०० वा. धम्म ध्वजारोहण व बुद्ध वंदना पार पडणार आहे. सायंकाळी ०७:०० वा. महापुरुषांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात येणार असून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला जाणार आहे.
दुसरा दिवस – विचारांचा जागर
शनिवार, दि. २ मे रोजी सायंकाळी ०७:०० ते १०:०० या वेळेत “शिवराय ते भीमराय” या विषयावर प्रा. श्रीकांत बरींगे (अकोला) यांचे दमदार जाहीर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर रात्री १०:०० ते १२:०० या वेळेत भीम प्रासादिक भजन मंडळाच्या सुरेल भजनांनी वातावरण भारून जाणार आहे.
तिसरा दिवस – क्रीडा, संस्कृती आणि सुरेल मेजवानी
रविवार, दि. ३ मे रोजी सकाळी १०:०० ते सायं. ०५:०० विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा रंगणार आहेत. सायंकाळी ०७:०० ते ०९:०० स्नेहभोजन (भोजनदान) आयोजित करण्यात आले असून रात्री ०९:३० वा. अरविंद मोहिते प्रस्तुत “लोकरंग महाराष्ट्राचा” या मराठी वाद्यवृंदाचा धमाकेदार कार्यक्रम होणार आहे.
चौथा दिवस – बालकांच्या कलागुणांची झळाळी
सोमवार, दि. ४ मे रोजी सायं. ०७:०० ते १०:०० लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सवाची रंगतदार सांगता होणार आहे.
या भव्य महोत्सवाचे आयोजन सम्राट अशोक मंडळ, पंचशील महिला मंडळ, सॅम ग्रुप शेंदुरजणे, सम्राट अशोक सामाजिक संस्था, मुंबई (रजि.) व ग्रामस्थ मंडळ शेंदुरजणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button