आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा जिल्ह्यातील कावडी हे पहिले उपहारगृह असलेले देशातील ग्रामपंचायत …

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) सातारा जिल्ह्यातील कावडी हे पहिले उपहारगृह असलेले देशातील ग्रामपंचायत …

(अजित जगताप)

सातारा दि: ग्रामीण भागातील ग्रामपंचायत म्हणजे स्वच्छ पाणीपुरवठा, दिवाबत्ती व शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवणे. असं त्याचे स्वरूप होते. आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू झाले असल्याने चेहरा बदलला आहे. सातारा जिल्ह्यातील कावडी तालुका जावळी ग्रामपंचायतने
स्वतःचे उपहारगृह निर्माण करून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सातारा जिल्हा भाजप नेते व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांच्या नेतृत्वाखाली व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जावळी तालुक्यातील कावडी गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात खऱ्या अर्थाने गावासाठी ग्रामस्थांनी जीव ओतला आहे. एवढेच नव्हे तर भारतातील पहिले उपहारगृह असलेले ग्रामपंचायत अशी विक्रमी नोंद करण्यास भाग पाडले आहे. ही सामुदायिक यशाची गुरुकिल्ली आहे.
कावडी गावचे सरपंच यशवंत मानकुमरे ,उपसरपंच शशिकांत मानकुमरे ,महिला सदस्य सौ मंगल लक्ष्मण.मानकुमरे, शंकर मानकुमरे, रंजना मानकुमरे, प्रफुल सकपाळ, कुमारी कार्तिकी कदम, महेश मानकुमरे त्याचबरोबर ग्रामविकास अधिकारी मंगेश शिंदे, ग्रामपंचायत कार्यालय सेवक वैभव याचबरोबर सर्व ग्रामस्थांचाही सहभाग आहे.
जावळी तालुक्यातील बहुचर्चित महू हातगेघर धरणामुळे विस्थापित झालेल्या कावडीकरांनी खऱ्या अर्थाने एक गाव.. एकजूट दाखवून दिली आहे. या अभिनव उपक्रमाचे सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर प्रियाताई शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी या कार्याचा आदर्श घेऊन महू ,विवर, पानस, घोटेकर, पिंपळी, गणेश पेठ, वहागाव, खर्शी बारामुरे , रांजणी, रुईकर, हातगेघर मुरा, करहर, काटवली सनपाने गावातील ग्रामस्थ या गावाला भेटी देत आहेत. आपल्या गावातील समृद्धी गाव हे स्वप्न असेच पूर्ण व्हावे यासाठी बांधणी करत आहेत.
कावडी गावात अभियानासाठी ग्रामपंचायत प्रशासन लोकाभिमुख, पारदर्शक आणि डिजिटल झाले आहे. ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवून कर वसुली शंभर टक्के झाली आहे.,
स्वच्छ व हरित कावडी गाव तसेच सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर होत आहे.घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, आणि वृक्षारोपण
आरोग्य केंद्र, अंगणवाडी, शाळा, स्मशानभूमी आणि क्रीडांगण यांचा दर्जा सुधारणा करण्यासाठी यश मिळाले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी लोकसहभगातून झालेले आहे . खऱ्या अर्थाने शासकीय योजनेची कावड ग्रामस्थांनी खांद्यावर घेऊन कावडी गावचा नावलौकिक केलेला आहे. या गोष्टीचा अभिमान वाटत असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक संदीप परामणे, बापूसाहेब मानकुमरे यांनी सांगितले.

2) सातारा जिल्हा रुग्णालय विरोधात रिपब्लिकन सेना आक्रमक २० एप्रिल रोजी आंदोलन…

सातारा दि: सातारा जिल्हा वाशी यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीन बाबत सामना करावा लागत आहे. याबाबत असंख्य लेखी व तोंडी तक्रारी रिपब्लिकन सेनेकडे आली आहे याबाबत जनतेचा आक्रोश दाखवण्यासाठी रिपब्लिकन सेना महाराष्ट्राचे नेते श्री रमेश अनिल उबाळे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २० एप्रिल रोजी अमरण उपोषण करण्याच्या आंदोलनाचा निर्णय घोषित केला आहे. 20 एप्रिल पर्यंत सुधारणा न झाल्यास या रुग्णालयाच्या विरोधात होणाऱ्या सर्व जबाबदारीला रुग्णालय प्रशासन व पोलीस यंत्रणा जबाबदार राहणार आहे असे त्यांनी सूचित केले आहे. याबाबतची निवेदन साताराचे अपर जिल्हा अधिकारी श्री मलिकार्जुन माने यांच्याकडे देण्यात आले.

क्रांतिकारकांच्या सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने जिल्हा शासकीय रुग्णालय कार्यरत आहे. याच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी व शासकीय कर्मचाऱ्यांना ह वैद्यकीय
बिल अदा करण्यासाठी टक्केवारी द्यावी लागत आहे. यापूर्वी लाचलचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली होती. संबंधितावर गुन्हा दाखल केला होता. त्याचे नूतनीकरण जवळ आलेले आहे. असं आता भाकीत करण्यात येत आहे.सातारा जिल्हा रुग्णालयातून अर्भक मृत्यू प्रकरणी, तसेच बोगस प्रमाणपत्रे, बोगस वैद्यकीय बिले देताना टक्केवारी अविभाज्य भाग झालेला आहे. या निधीत खूप मोठे वाटेकरी असले तरी खुलेआम भ्रष्टाचाराचे सलाईन लावले जात आहे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींना निलंबित केले पाहिजे. कोणतेही सरकार सत्तेवर आले तरी यांची मक्तेदारी मोडून निघत नाही. यामुळे भ्रष्टाचाराचे कुराण झालेले आहे. याला जाब विचारण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने 20 एप्रिल रोजी सातारा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर भर उन्हात आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
सातारा जिल्हा शल्य चिकित्सक या पदावर असताना आरोग्य मंत्र्यांकडून त्रिसदस्य समिती चौकशी करत आहे. सदर शल्यचिकित्सक पदावर असल्यामुळे या चौकशीत ते पुरावे नष्ट करू शकतात व आपल्या पदाचा गैरवापर करून यातून निर्दोष सुटू शकतात, त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करावे या चौकशीमध्ये त्यांच्या कार्यकाळात ज्यांना वैद्यकीय बिल अदा केलेले आहे. त्याची फिर तपासणी करावी. महत्वाचे म्हणजे या जगात येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लहान बाळाची हत्या होते. अर्भक जन्माला येण्यापूर्वीच जिल्हा रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने असलेल्या रुग्णालयातच अर्भकाला प्राण गमवावे लागतात. हे लांचनस्पद आहे. या प्रकाराचा आम्ही निषेध करतो. या सर्व प्रकरणाची चुकून चौकशी व्हावी. कारण हिंदुत्वाचे रक्षण करणाऱ्या सरकारमध्ये हिंदूंवर अन्याय होत आहे हे काही संघटना खपवून घेतील पण आम्ही खपवून घेणार नाही कारण आम्ही सर्व धर्म स्वभाव मानतो असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय नेते श्री अनंतराज आंबेडकर व डॉ. सुशीलकुमार सूर्यवंशी, युवा नेते अमन आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या आंदोलनामध्ये रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र नेते श्री रमेश अनिल उबाळे, अशोक भिसे, विशाल भोसले ,नितीन रोकडे, गौतम रणदिवे, पद्माताई सुतार, रमेश गायकवाड, विशाल वायदंडे प्रकाश कांबळे संदीप सावंत , सरफराज बागवान, दीपक ओव्हळ, राजू कदम यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सदर निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, बाल कल्याण मंत्री ते सातारा पोलीस अधीक्षक, सातारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button