सोलापूर जिल्हा कारागृहात ‘वाव’ संस्थेतर्फे महिला कैद्यांना सॅनिटरी पॅडचे वाटप व आरोग्यविषयक समुपदेशन संपन्न.
पत्रकार संगीता फाळके पुणे शहर महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सोलापूर जिल्हा कारागृहात ‘वाव’ संस्थेतर्फे महिला कैद्यांना सॅनिटरी पॅडचे वाटप व आरोग्यविषयक समुपदेशन संपन्न.

सामाजिक बांधीलकी जपण्याच्या उद्देशाने ‘वाव’ (Wow) या सामाजिक संस्थेच्या वतीने सोलापूर जिल्हा कारागृहातील महिला कैद्यांसाठी एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत महिलांच्या वैयक्तिक आरोग्याची व मासिक स्वच्छतेची निकड लक्षात घेऊन सर्व महिला कैद्यांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. कारागृह अधीक्षक श्री. सुशील कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत व वरिष्ठ जेलर श्री बिरू खेळबुटे यांच्या सहकार्य ने हा स्तुत्य उपक्रम पार पडला. या वेळी संस्थेच्या प्रतिनिधींनी महिलांशी आत्मीयतेने संवाद साधत मासिक पाळीदरम्यान घ्यावयाच्या स्वच्छतेचे महत्त्व आणि आरोग्याची काळजी याविषयी अत्यंत प्रभावी समुपदेशन केले.
या सामाजिक उपक्रमासाठी ‘वाव’ संस्थेच्या संस्थापिका विद्या लोलगे यांच्यासह सायरा शेख, मारता असादे, पुष्पा हलकुडे, गौरा कोरे, कांचन चौगुले, लक्ष्मी माने आणि वैशाली देशपांडे यांनी सोलापूर कारागृहात प्रत्यक्ष भेट देऊन हे वाटप केले. संस्थेच्या या संवेदनशील आणि कौतुकास्पद पुढाकारामुळे कारागृहातील महिलांना दिलासा मिळाला असून, उपक्रमाच्या शेवटी सर्व महिला कैद्यांनी ‘वाव’ संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.





