कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रेकिंग न्यूज | सुपा औद्योगिक वसाहतीत भीषण आग – “दरवर्षी लागणारी आग… अपघात की षडयंत्र?”

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

ब्रेकिंग न्यूज | सुपा औद्योगिक वसाहतीत भीषण आग – “दरवर्षी लागणारी आग… अपघात की षडयंत्र?”

 प्रतिनिधी राजकुमार इकडे

पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक परिसरात आज (दि. ३०) पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास व्यंकटेश्वर कंपनीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. नगर–पुणे महामार्गालगत पळवे–घानेगाव शिवारातील गट क्र. २६५ मध्ये ही कंपनी कार्यरत असून, पीजी व एलजीसारख्या नामांकित कंपन्यांना माल पुरवठा केला जात होता.
आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले, तरी काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले. आग इतकी भीषण होती की, अग्निशामक दलाला घटनास्थळी पोहोचण्यात मोठ्या अडचणी आल्या. कंपनी परिसरात मालवाहतूक गाड्यांची मोठी गर्दी असल्याने अग्निशामक गाड्यांना आत प्रवेश करता आला नाही. परिणामी, आग नियंत्रणाबाहेर गेली आणि संपूर्ण कंपनी जळून खाक झाली.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले असून, कंपनीतील सुमारे ५०० हून अधिक कामगारांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.
विशेष म्हणजे, याच कालावधीत मागील वर्षीदेखील याच व्यंकटेश्वर कंपनीला आग लागली होती. त्यामुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, “ही केवळ दुर्घटना नसून षडयंत्र तर नाही ना?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
घटनास्थळी पारनेरचे तहसीलदार तसेच सुपा परिसरातील अनेक राजकीय नेत्यांनी भेट देऊन पाहणी केली. सकाळी लागलेली आग तब्बल ८ तास उलटूनही पूर्णपणे नियंत्रणात आली नव्हती.
👉 प्रश्न कायम: वारंवार लागणाऱ्या आगीमागे नेमकं कारण काय?
👉 प्रशासन सखोल चौकशी करणार का?
👉 कामगारांना न्याय मिळणार का?

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button