वाईला वादळी पावसाने झोडपले; सुसाट वारा अन् गारांच्या वर्षावामुळे वाईकर सुखावले!
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

असे अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाईला वादळी पावसाने झोडपले; सुसाट वारा अन् गारांच्या वर्षावामुळे वाईकर सुखावले!

वाई शहर प्रतिनिधी नित्यानंद मोरे
सातारा वाई.
गेल्या काही दिवसांपासून उखाड्याने हैराण झालेल्या वाईकरांना आज दिनांक ३०/३/२०२६ सोमवारी दुपारी ३ वाजल्यापासून वरून राजाने मोठा दिलासा दिला. वाई शहरात आणि सभोवतालच्या परिसरात आलेल्या सुसाट वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे सर्वांचीच धावपळ उडाली मात्र अल्हाद गारव्यामुळे वाईकर चांगलेच सुखावले आहेत. या पावसामुळे शहराच्या सखल भागात काही ठिकाणी पाणी साठण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून आले तसेच सोमवार वाईचा बाजाराचा दिवस असल्याने संपूर्ण भाजी मंडईत भाजी विक्रेते फळ विक्रेते यांची चांगलीच तारांबळ उडाली सुसाट वाऱ्यासह गारांच्या पावसात काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडणे तसेच वीज पुरवठा खंडित होणे हे प्रकार घडले असून शेतीचेही नुकसान मोठ्याप्रमाणात झाल्याची समजते मात्र या पावसामुळे शेतीच्या कामालाही वेग येणार आहे. एकंदरीत या धडाकेबाज सुसाट वाऱ्यासह गारांच्या पावसाने वाईकर उकाड्यापासून सुखावले हे मात्र नक्की.!
2) वाई नगरपरिषदेचा”राम भरोसे” कारभार! बंदिस्त गटारांचे काम की भ्रष्टाचाराची खाण?

सातारा वाई.
वाई शहराच्या स्वच्छतेसाठी आणि सांडपाणी नियोजन यासाठी वाई शहरात अनेक ठिकाणी बंदिस्त गटार कामे चालू आहेत मात्र हि कामे पुर्ण पणे “राम भरोसे” असल्याचे चित्र दिसून येत आहे. *चार ते सहाच महिन्यांत कामांची ही अवस्था.* वाई नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचे याकडे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष आणि ठेकेदार यांची वाढलेली मनमानी यामुळे जनतेच्या पैशाची उधळपट्टी तर होत नाही ना?असेच चित्र पहायला मिळत आहे वाई शहरात अनेक ठिकाणी बंदिस्त गटार कामे सुरू आहेत मात्र या कामांचा तांत्रिक दर्जा आहे की नाही आणि असला तरी तो पाळला जातोय की नाही हे ही पहाणे गरजेचे आहे. नाही तर येणाऱ्या काळात हि बंदिस्त गटारे वाई करांची डोकं दुखी ठरणार यात काही शंकाच नाही यासाठी याकडे तत्परतेने लक्ष देणे गरजेचे आहे.
*वाई नगरपरिषदचे अधिकारी कुणासाठी गप्प!*
विशेष म्हणजे या कामाची पहानी करण्यासाठी नेमणूक करण्यात आलेले अधिकारी हे गारव्याला बसून ओके रिपोर्ट तयार तर करत नाहीत ना?कामाचा दर्जा हा फारच घसरलेला दिसत आहे ठेकेदारांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे *पालिका अधिकारी सुस्त! आणि ठेकेदार मस्त!* अशी परिस्थिती सध्या वाई नगरपरिषदे पहायला मिळत आहे.अशा प्रकारच्या कामांमुळे येणाऱ्या काळात वाईकरांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवणार आहे तरी या कामांची चौकशी करून संबंधित ठेकेदार व संबंधित वाई नगरपरिषदेचे अधिकारी वर्ग यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी वाईकर नागरिक करत आहेत.




