आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय होऊन सुद्धा संचालकांचे मौन….

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) सातारा जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय होऊन सुद्धा संचालकांचे मौन….

 जिल्हा प्रतिनिधी अजित जगताप

सातारा दि: शेतकऱ्यांची बँक असा नावलौकिक असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तत्त्वप्रणाली आदर्शवत होती. आता ती इतिहास जमा झाली असून त्याला अनेक कारणे आहेत. नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या वेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक यांना धक्काबुक्की झाली. नवलाईची गोष्ट म्हणजे याबाबत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व संचालक व कर्मचारी अधिकाऱ्यांनी मौन धारण केले आहे. जे संचालकांचे होऊ शकत नाहीत ते काय शेतकऱ्यांचे होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांना सुलभ कर्जपुरवठा करण्यासाठी स्थापन झाली. या बँकेला यंदाच्या वर्षी मध्ये १९७ कोटी ८८ लाखांचा नफा झाला असून, ३१९ शाखांच्या नेटवर्कसह ती कार्यरत आहे . जिल्ह्यात बँकेच्या ३१९ शाखा व ९६० सोसायट्यांच्या माध्यमातून विस्तृत नेटवर्क आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जडणघडणीमध्ये संचालक व पदाधिकाऱ्यांचा सिंहचा वाटा आहे. असे असताना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून व जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवड नाट्य मध्ये सत्ताधारी महायुतीतील भाजप सरकारने धुडगूस घातला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष व खासदार नितीनकाका पाटील , राज्याचे मंत्री व ज्येष्ठ संचालक मकरंदआबा पाटील यांना धक्काबुक्की तर व्हॉइस चेअरमन असलेल्या अनिल देसाई यांच्यावर तर अपहरण आणि खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवून त्यांना तुरुंगात डांबले. हा सर्व प्रकार हा सत्तेसाठी केल्यामुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळात याबाबत पाऊण तास चर्चा झाली. सर्व महाराष्ट्रातील प्रसार माध्यमांनी त्याची नोंद घेतली. पण, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इतिहासात अशाप्रकारे कधीही संचालक मंडळाने मौन धारण केले नव्हते. शंभर पुरस्कार प्राप्त केलेल्या जिल्हा बँकेला आपलं मत व्यक्त करण्याचाही अधिकार राहिलेला नाही. विशेष बाब म्हणजे २० संचालकांपैकी राजकारणात प्रभाव असलेले श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,रामराजे नाईक निंबाळकर, बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे, दत्तात्रय ढमाळ, सत्यजित पाटणकर, प्रदीप विधाते, सुनील खत्री, रामभाऊ लेंभे, सुरेश सावंत, लहुराज जाधव, कांचन साळुंखे, ऋतुजा पाटील, ज्ञानेश्वर रांजणे, शेखर गोरे, राजेंद्र राजपुरे यांच्यासारखे संचालक जिल्हा बँकेत आहेत.
सातारा जिल्हा परिषद व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचे अतूट नाते आहे. त्यामुळे घडलेल्या घटनेबाबत जिल्हा बँकेमार्फत भूमिका स्पष्ट होणे गरजेचे आहे. परंतु याबाबत संचालकांनी मौन धारण केले आहे. जे जिल्हा बँकेच्या संचालकांचे होऊ शकत नाहीत. त्यांच्या अडीअडचणीला मदतीला धावून जात नाहीत. ते मौनी बाबा सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे काय भले करणार? असा आता मार्मिक प्रश्न सातारा जिल्ह्यातील शेतकरी बांधव व जिल्हा परिषदेचे संबंधित विचारू लागलेले आहेत. जर संचालक जर मौन धारण करत असतील. तर शंभर पुरस्कार काय चुलीत घालायचे आहेत का? सध्या गॅस टंचाईमुळे चुलीला महत्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे ज्यांना आपलं मत नोंदवायचं नाही. त्यांना मिळालेला पुरस्कार चुलीत घालण्या सारखाच आहे. अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
दरम्यान, याबाबत जिल्हा बँकेचे काही संचालक प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत असल्याने याची आता सभासद सुद्धा नोंद घेतील असे काही सभासदांनी स्पष्ट केले आहे.

2) सातारा:-इलेक्ट्रिक वाहनांच्या मार्केटिंगसाठी साताऱ्यात कृत्रिम पेट्रोल टंचाई आरोप…

अजित जगताप

सातारा दि: आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेऊन सध्या कृत्रिम पेट्रोल टंचाईचा जुनाच फंडा शोधण्यात आला. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचे मार्केटिंग सोपं झाले. जागरूक ग्राहक हा पेट्रोल- डिझेल व सी.एन.जी. वर चालणाऱ्या वाहनावरच जास्त भिस्त ठेवत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या ही दुर्घटना घडतात त्यामुळे लोकांनी मार्केटिंग फंड्याला फसू नये. कृत्रिम डिझेल पेट्रोल टंचाई असल्याचाही आरोप काही वाहन चालकांनी केला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती ही सुरू आहे.
अमेरिका- इसराइल- इराण युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान झाले असले तरी कोणतीही तेल विहिरी मिसाईल व बॉम्ब मुळे पेटलेली नाही. फक्त अफवा पसरवून अनेक जण त्याचा फायदा घेऊ लागलेले आहेत. सत्य समजण्यापूर्वीच काहींची फसगत होत असते. कोरोना काळातही अशा पद्धतीने फसगत करून अनेकांना आर्थिक गंडा घालण्यात आला होता.
वैद्यकीय क्षेत्र व औषध निर्माता कंपन्या यांच्या नफ्यामध्ये भरमसाठ वाढ झाली असली तरी मृत्यूचे दर कमी करता आलेले नाही. तसाच काहीसा प्रकार आता वाहनांच्या बाबतीत सुरू झालेला आहे. सध्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावरील खड्डे व निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे वाहनांची वाट लागत आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे इलेक्ट्रिक वाहनांचे होत असल्यामुळे गाड्या आपल्या डिझेल पेट्रोलचे वाहन बरे असे आता लोकांना वाटू लागलेले आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादन केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहक नसल्यामुळे अगोदर पेट्रोल डिझेल पंपावर गर्दी दाखवा. त्यानंतरच इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या जाहिरातीत दाखवा किंवा छापा असा गुप्त पद्धतीने प्रचार सुरू झाल्यामुळे जाहिरातीचा मिसाईल सारखा मारा होत आहे.
नेमक्या आठ पंधरा दिवसात इलेक्ट्रॉनिक वाहनाच्या जाहिरातीचा मारा होऊ लागल्यामुळे या पाठीमागे मार्केटिंग असल्याचे अनेक अर्थ तज्ञांनी सांगितले. कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा व त्याबाबत लागणारी साधनसामग्री सध्या धुळखात पडू नये. कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा आता अनेक यंत्रणा कोलमडून पडलेले आहे. काही साधनसामुग्रीने भंगार म्हणून दवाखाने मधून डिस्चार्ज घेतलेला आहे. तशीच परिस्थिती आता निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सध्या कडक उन्हाळ्यामुळे अनेक वाहने पेट घेतात. तापमान वाढल्यामुळे उन्हाळ्यात वाहनाचे टायर सुद्धा फुटलेले घटना घडलेले आहेत. भविष्यात पावसाळ्यात इलेक्ट्रिक वाहनांना शॉर्टसर्किट होण्याची भीती काही वाहन चालकांनी व्यक्त केली आहे. खंबाटकी घाटामध्ये ट्राफिक जाम झाल्यानंतर अनेक इलेक्ट्रॉनिक वाहने टोइंग गाडीने घेऊन जावे लागले. यासाठी तीन हजारापासून पाच हजारापर्यंत अनेकांना खर्च आला होता. सेकंड हॅन्ड वाहन घेताना अनेक जण इलेक्ट्रॉनिक वाणी नको भावा असं म्हणत आहेत.

वास्तविक पाहता अत्याधुनिक यंत्रणा व कमी डिझेल पेट्रोलचा तसेच इथेनॉल वापर काळानुरूप होणे गरजेचे आहे. त्याबद्दल कोणाची दुमत नाही. परंतु सध्या कृत्रिमरीत्या पेट्रोल डिझेलच्या टंचाईने काहींची फसगत होत आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर वाहनांची तुरळक गर्दी असून मुबलक प्रमाणात पेट्रोल व डिझेल असल्याने नियमितपणाने इंधन भरणाऱ्यांना इंधनाची टंचाई जाणवत नाही. बऱ्याच पेट्रोल पंपावरची तुरळक गर्दी दिसून आलेली आहे. सध्या प्रसार माध्यमातून पेट्रोल पंपावर त वाहनांची गर्दी दाखवली जात आहे . तो व्हिडिओ क्लिप व बातम्यांमधून दिसणारे फोटो हे आपल्याला बुद्धीभेद करू शकतात. त्यामुळे केंद्र व राज्य शासन असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असून अथवा पुरवठा विभागाने सातत्याने याबाबत जनजागृती केलेली आहे. शेवटी लोकांनी काळजीत न पडता धीर धरला पाहिजे. वस्तूची समजून घ्यावी. व्यापारी वृत्ती वाढल्यामुळेच अशा घटना घडत आहेत. अशी माहिती देण्यात आली. सातारा शहरातील रेणुका पेट्रोल पंप चे मालक रितेश रावखंडे यांनी सांगितले की, मुबलक प्रमाणात पेट्रोल व डिझेलची विक्री नियमित होत आहे. नेहमीचे ग्राहक पेट्रोल डिझेल खरेदी करतात. कोणताही तुटवटा नाही. ज्यांना पेट्रोल व डिझेल हवे आहे त्यांनी कोणत्याही पेट्रोल पंपात जाऊन डिझेल पेट्रोल अथवा सी.एन.जी. भरावे असे त्यांनी स्पष्ट केले. काही वेळेला विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर काही मिनिटासाठी समस्या होते. तर काहीजण गर्दी दाखवत असले तरी पेट्रोल व डिझेलचा साठा मुबलक आहे. हे सुद्धा जाणीवपूर्वक लोकांपर्यंत पोहोचवावे. अशी विनंती केली आहे.

3) सायगाव:-पवारवाडी माजी सरपंच संजय पवार यांचे निधन…

सायगाव दि: जावळी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या सायगाव भागातील पवारवाडी गावचे माजी सरपंच संजय प्रतापराव पवार वय -५५ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पवारवाडी गावचे माजी सरपंच व तालुक्यामध्ये सर्वांना परिचित असणारे पवारवाडी गावच्या विकासात मोलाचे योगदान देणारे संजय प्रतापराव पवार यांच्या निधनाची बातमी समजतात. अनेकांना धक्का बसला. जावळी तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या नावाचा चांगला दबदबा निर्माण केला होता. त्यांच्या निधनाने पवार कुटुंबावर व पवारवाडी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची ताकद ईश्वर त्यांना देवो त्यांच्या या दुःखामध्ये संपूर्ण पवारवाडी, येरुणकरवाडी, कदमवाडी आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ सामील आहोत. सरपंच ,उपसरपंच व सदस्य सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. पवारवाडी या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर
अंत्यविधी करण्यात येणार आहे. एक धडाडीचा कार्यकर्ता तसेच मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांच्या मित्र परिवारामध्ये शोककळा पसरली आहे. पाचगणी या ठिकाणी त्यांची प्राथमिक शिक्षण झाले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुली व वारकरी संप्रदायाचे बंधू ह. भ. प. विजय महाराज पवार असा परिवार आहे. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सायगाव भागाचे भाग्यविधाते छत्रपती पुरस्कार पहिलवान साहेबराव आबाजी पवार, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, वसंतराव मानकुमरे,युवा नेते दीपक पवार, जिल्हा परिषद सदस्य सौ. जयश्री सुहास गिरी, सभापती सौरभ शिंदे, उपसभापती गोरख महाडिक व मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button