कराड:-मलकापूर यात्रेत जंगी कुस्त्यांचा थरार; पै. सरकार पवार ठरला ‘कराड दक्षिण केसरी’
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कराड:-मलकापूर यात्रेत जंगी कुस्त्यांचा थरार; पै. सरकार पवार ठरला ‘कराड दक्षिण केसरी’

सातारा प्रतिनिधी सारिका गवते
कराड, दि. २६ : मलकापूर येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवी व ह. पीर साहेब यांच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जंगी कुस्त्यांनी यंदाही कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे अक्षरशः पारणे फेडले. धार्मिक श्रद्धा आणि क्रीडारसिकता यांचा संगम अनुभवायला मिळालेल्या या यात्रेला मोठी गर्दी उसळली होती.
यात्रेचे मुख्य आकर्षण ठरलेल्या कुस्ती मैदानात मलकापूरचा सुपुत्र पै. सरकार पवार याने दमदार कामगिरी करत ‘कराड दक्षिण केसरी’ किताब पटकावला. त्याचबरोबर मलकापूरच्या मानाच्या चांदीच्या गदेवर आपले नाव कोरत त्याने गावाचा अभिमान उंचावला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रातील नामांकित मल्लांनी या मैदानात हजेरी लावली होती. चुरशीच्या आणि रंगतदार झालेल्या लढतींमध्ये –
🥇 प्रथम क्रमांक: पै. धनाजी कोळी (हनुमान आखाडा, पुणे)
🥈 द्वितीय क्रमांक: सिद्धेश साळुंखे (हिंदकेसरी आखाडा, सैदापूर)
🥉 तृतीय क्रमांक: पै. ओंकार कोकाटे (हनुमान आखाडा, पुणे)
या कुस्त्यांचे नियोजन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष व यात्रा कमिटीचे मार्गदर्शक अशोकराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. यात्रा कमिटीचे अध्यक्ष अजितकाका थोरात, उपाध्यक्ष राजू मुल्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आखाड्याचे उत्कृष्ट संचालन केले.
यावेळी कराड पोलीस दल, अनुभवी पंच, परिसरातील कुस्तीप्रेमी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“ग्रामस्थांची एकजूट आणि युवकांचा उत्साह यामुळे ही परंपरा अधिक बळकट होत आहे,” अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.
या यशस्वी आयोजनासाठी सचिव सुधाकर शिंदे, दिग्विजय शिंदे, पंडित शिंदे, राहुल शिंदे, आबासाहेब शिंदे, दीपक बोरगे, पोलीस पाटील प्रशांत गावडे यांच्यासह सर्व सदस्य व ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.




