वाई:-किसन वीर महाविद्यालयात डॉ.जयवंत चौधरी यांची विशेष मुलाखत.
पत्रकार रेखा येवले सातारा जिल्हा महिला उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

किसन वीर महाविद्यालयात डॉ. जयवंत चौधरी यांची विशेष मुलाखत.

सातारा प्रतिनिधी रेखा येवले
वाई : येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या वतीने शुक्रवार दिनांक २७ मार्च २०२६ रोजी जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी यांची विशेष मुलाखत आयोजित करण्यात आली आहे.
या मुलाखतीत भारतीय चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध निर्माते, कलाकार व लेखक श्री. तेजपाल वाघ हे डॉ. जयवंत चौधरी यांच्याशी मुलाखतकार म्हणून संवाद साधणार आहेत. कार्यक्रमासाठी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. मदनदादा भोसले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. (डॉ.) अंबादास सकट, डॉ. बाळकृष्ण मागाडे, श्री. जयवंत खोत, श्री. संतोष मुळीक, सौ. रेश्माबानो मुलानी, श्रीमती सुलभा घोरपडे आदी संयोजक म्हणून काम पाहत आहेत.
मा. चौधरी सरांची अध्यापक, लेखक, संशोधक व प्रशासक म्हणून असलेली चौफेर कारकीर्द तसेच त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान, नेतृत्वगुण व अनुभव समजून घेण्याच्या उदात्त हेतूने सदर मुलाखतीचे आयोजन करण्यात येत आहे. सदर मुलाखत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व दिशादर्शक ठरेल असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी व्यक्त केला आहे. वाई तसेच पंचक्रोशीतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर मुलाखतीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे व संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.




