सातारा:-बसपा नेते कांशीरामजी यांनी बहुजन समाजाला जागृत केले : प्रशांत झाल्टे
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) सातारा:-बसपा नेते कांशीरामजी यांनी बहुजन समाजाला जागृत केले : प्रशांत झाल्टे

सातारा : महामानव घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी उत्तर प्रदेश येथे बहुजन समाजाला जागृत केले. त्यामुळे उत्तर प्रदेशामध कुमारी मायावती या बहुजन समाज पक्षाच्या पहिल्या मुख्यमंत्री बनल्या असे प्रतिपादन सातारा येथे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत झाल्टे यांनी केले.
बसपा नेते आदरणीय काशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंबेडकरवादी व बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जयंती साजरी केली. यावेळी श्री झाल्टे बोलत होते.
अध्यक्षस्थानी संजय नित्यनवरे होते.
यावेळी आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक सुदर्शन इंगळे, माजी नगरसेवक अमर गायकवाड, चंद्रकांत खंडाईत आदींनी मनोगत व्यक्त केली. प्रथमतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व कांशीराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.भन्ते दिंपकर (थेरो) यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण विधी पार पाडला. पी.टी.कांबळे यांनी प्रास्ताविक केले . ज्येष्ठ पत्रकार व मार्गदर्शक अनिल वीर यांनी सूत्रसंचालन केले.शाहीर किरण जगताप यांनी कांशीराम यांच्या जीवनावर तुकाराम गायकवाड यांच्या साथीने सुमधुर गीत सादर केले. दिलीप सावंत यांनी आभार मानले.
सदरच्या कार्यक्रमास ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते व शाळा प्रवेश दिन सोहळ्याचे साक्षीदार वामनदादा म्हस्के, नारायण जावलीकर, उत्तम पोळ, डॉ. आबासाहेब उमाप, माजी प्राचार्य रमेश मस्के,शाहीर प्रकाश फरांदे, श्रीरंग रणदिवे व सत्यवान गायकवाड,सी. जगताप,सतीश गाडे,बी.एल. माने,अशोक कांबळे, डी.एस. भोसले,रामदास गायकवाड, सीताराम गायकवाड,मिलिंद जगताप आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
2) मेढा:-जावळीच्या भाजप सभापती पदासाठी राष्ट्रवादीची तटस्थ भूमिका……

(अजित जगताप)
मेढा दि: जावळी तालुक्यात भाजपच्या विरोधात मतदारांनी मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हसवे गणातील राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे नातेवाईक सौ श्वेता मिलिंद शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडून आणले. त्यांनीच सभापती व उपसभापती पदाच्या निवडीच्या वेळेला तटस्थ भूमिका घेतली. त्यामुळे भाजपचा विजय निश्चित झाला. या राजकारणाच्या खेळीमुळे जावळीत ज्येष्ठ नेते शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचा अस्त झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या जावळी पंचायत समितीच्या या निवडणुकीत भाजपचे सौरभ राजेंद्र शिंदे- कुडाळ गण, सौ. चारुशीला पवार- सायगाव गण, गोरख महाडिक- खर्शी बारामुरे गण हे तीन सदस्य निवडून आले आहेत.म्हसवे गणातून सौ शिल्पा शिंदे या राष्ट्रवादीशरदचंद्र पवार पक्षाकडून निवडून आल्या आहेत. कुसुंबी गणातून सौ सुनीता दूंदळे व आंबेघर तर्फ मेढा या गणातून अतीश कदम मुळ राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी असले तरी शिवसेना चिन्हावर लढले. ईश्वरी चिट्टीवर निर्णय होत असतानाच राष्ट्रवादीच्या सौ श्वेता मिलिंद शिंदे यांनी तटस्थ भूमिका घेऊन भाजपच्या सभापती व उपसभापतीचे निवड निश्चित केली आहे. यामुळे भाजप विरोधात म्हसवे गणात मतदान करणाऱ्या मतदारांना एक आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. यापेक्षा भाजपचे उमेदवाराला मतदान केले असते तर बरे झाले असते. असे काही मतदारांनी सांगितले. याबाबत जनतेच्या न्यायालयात दाद मागण्याची काहींनी मागणी केली आहे.
जावली पंचायतीच्या स्थापनेपासून काँग्रेस, एस,काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी पक्षाच्या ताकतीवर सभापती व उपसभापती पद मिळवले होते. शिवसेनेचे भाऊसाहेब उभे यांना फोडून सत्तांतर केले होते .असाच काहीसा प्रकार एका सदस्याच्या तटस्थ राहण्यामुळे झाला आहे. भाजपचे निवनिर्वाचित सभापती सौरभ शिंदे, उपसभापती गोरख महाडिक यांचे ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले जि.प. सदस्य वसंतराव मानकुमरे,जि.प. सदस्या जयश्रीताई सुहास गिरी, अमित दादा कदम, सुहास गिरी, भाजप तालुका अध्यक्ष संदीप परामणे, राष्ट्रवादी पंचायत समिती सदस्या सौ . श्वेता मिलिंद शिंदे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . त्यांनी अभिनंदन केले.
मेढा पंचायत समितीमध्ये सभापती, उपसभापती निवडीसाठी आज विशेष सभा सभागृहामध्ये पिठासन अधिकारी राजश्री मोरे यांचेअध्यक्षतेखाली सभेचे सदस्य व सभागृहाचे सचिव तथा गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, तहसिलदार प्रविण मुगदुल, सपोनि सुधीर पाटील उपस्थित होते .सभापती पदासाठी भाजपकडून सौरभ शिंदे तर सेना व मित्र पक्षाच्या कडून कुसुंबी गटाच्या पं.स.सदस्या सुनिता दुंदळे यांचा अर्ज दाखल झाला होता. तर उपसभापती पदासाठी भाजपकडून गोरख महाडीक तर सेनेकडून सुनिता दुंदळे असे अर्ज दाखल झाल होते. आतिश कदम हे ओ.बी.सी. गणातून निवडून आल्यामुळे त्यांना डावलण्यात आले का? याबाबत आता शिवसेना व राष्ट्रवादीने खुलासा करावा. अशी मागणी होऊ लागलेली आहे.
शिवसेनेच्या सुनिता दुंदळे यांनी उपसभापती पदाचा अर्ज माघारीघेतल्याने भाजपचे गोरख महाडीक बिनविरोध निवडून आले. सभापती पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली.
त्यामध्ये सौरभ शिंदे यांना तीन मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे सदस्या सौ .शिल्पा शिंदे यांनी तटस्थ भूमिका घेतल्याने सुनिता दुंदळे यांना दोन मते मिळाली. या प्रक्रियेमध्ये भाजपचे सौरभ शिंदे हे बहुमताने विजयी झाले.
यापूर्वी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी ची सत्ता होती. ती संपुष्टात आणण्यामध्ये राष्ट्रवादी सदस्यांनी सिंहाचा वाटा उचललेला आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना संपर्क साधताना संकोचित वाटत होते. त्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. या निवडीनंतर म्हसवे गणात काही भागात राष्ट्रवादीला मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये शोककळा पसरली होती.



