लोणंद:-“लोणंदमध्ये पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक!” सातारा पोलीसांची धडाकेबाज कारवाई; ३ पिस्तुलं, ५ काडतुसे जप्त – १२.६७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, ५ जण गजाआड!
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

“लोणंदमध्ये पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक!”
सातारा पोलीसांची धडाकेबाज कारवाई; ३ पिस्तुलं, ५ काडतुसे जप्त – १२.६७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, ५ जण गजाआड!

लोणंद दि. १४ : जिल्ह्यात अवैध शस्त्रांची छुपी हालचाल सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) लोणंद बसस्थानक परिसरात सापळा रचला आणि भरदिवसा थरारक कारवाई करत शस्त्र तस्करीचा मोठा डाव उधळून लावला. या धडक कारवाईत पाच आरोपींना जेरबंद करण्यात आले असून १२ लाख ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व रोहित फार्णे यांच्या पथकाने साध्या वेशात परिसरात लक्ष ठेवले. संशयास्पद मारुती सुझुकी एर्टिगा कार येताच पोलिसांनी क्षणार्धात घेराव घालत आरोपींना पळून जाण्याआधीच ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान ३ देशी बनावटीची पिस्तुलं, ५ जिवंत काडतुसे, ६ मोबाईल हँडसेट आणि एर्टिगा कार असा घातक साठा जप्त करण्यात आला. अटक आरोपी वाई तालुक्यातील असून त्यांचे वय २० ते ३४ वर्षे आहे. निखिल मोरे, आयुष अडसुळ, यश चव्हाण, नितीन वाडकर आणि सनी भोसले अशी त्यांची नावे आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जिल्ह्यात अवैध शस्त्रांना थारा नाही, असा कडक संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
लोणंद पोलीस ठाणे येथे शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या शस्त्रांचा पुरवठा कोणाला होणार होता याचा तपास वेगाने सुरू आहे.
साताऱ्यात गुन्हेगारांवर पोलिसांचा दरारा पुन्हा एकदा अधोरेखित झाला!




