कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-पाऊस नाही , पिके उध्वस्त , कोरडा दुष्काळ खासदार , आमदार ‘ नेत्यांचाही दुष्काळ : निलेश शेडगे

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 श्रीरामपूर:-पाऊस नाही , पिके उध्वस्त , कोरडा दुष्काळ खासदार , आमदार ‘ नेत्यांचाही दुष्काळ : निलेश शेडगे

श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) पावसाने महिनाभर हुलकवणी दिल्याने नगर जिल्ह्यात भीषण दुष्काळी भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे . उभी पिके जळून गेल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे उभी पिके जळून गेल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे . अशी भयानक आपत्ती असताना खासदार आमदार नेते गायब आहेत त्याचाही जिल्ह्यात दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांना आपले दुखणे सांगायचे कुणाला असा सवाल शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे यांनी केला आहे
श्री शेडगे यांनी जिल्ह्यातील भीषण दुष्काळी स्थितीकडे लक्ष वेधले त्यांनी सांगितले की गेले महिनाभर पाऊस नाही विहिरी कोरड्या पडल्या उभे पिके पाण्याअभावी जवळून गेली . जनावरांना चारा नाही काही गावात प्यायला पाणी नाही शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय . पुढे कसे होणार ही काळजी भेडसावत असताना नेते मंडळी मात्र बेफिकीर असल्याचा आरोप त्यांनी केला
यां पार्श्वभूमीवर श्री .शेडगे यांनी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आलेत का खासदार , आमदार , नेते कारखान्याचे चेअरमन , संचालक बाजार समितीचे पदाधिकारी आणि मिरवणारे नेते पुढारी तुमची चौकशी करायला असा संतप्त सवाल करून चीड व्यक्त केली आहे . त्यांच्यासाठी तुम्ही घरात भांडणं केली ‘ मित्रांशी वाद घातला ‘ आमचाच नेता कसा सगळ्यात भारी आहे हे सांगायला लोकांच्या घरचे उंबरठे झिजवले , घरावर तुळशीपत्र ठेऊन रात्रांदिवस प्रचार केला ते आलेत का तुमच्या चौकशीला असा भावनिक प्रश्न केला आहे . तुम्ही कुठल्या अवस्थेत आहात हे बघायला त्यांना वेळ नाही ते सत्ता भोगण्यात , ऐशोरामात जगण्यात आणि संपत्ती कमवून मालमत्ता जमविण्यात दंग असल्याने त्यांना तुमच्यासाठी वेळ नाही महत तर लांबची गोष्ट पण साधी विचारपूस करायला त्यांना सवड नाही अशी खरमरीत टिका श्री . शेडगे यांनी व्यक्त केली

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button