वाई:-थरावर थर… जल्लोषाचा कहर! वाईत विकास अण्णा शिंदे मित्र परिवाराची भव्य दहीहंडी; सिद्धनाथवाडीच्या गोविंदांनी मारली बाजी!
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-थरावर थर… जल्लोषाचा कहर! वाईत विकास अण्णा शिंदे मित्र परिवाराची भव्य दहीहंडी; सिद्धनाथवाडीच्या गोविंदांनी मारली बाजी!

वाई | दि. १० : गोपाळकाला आणि श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाई शहरात ‘विकास अण्णा शिंदे मित्र परिवार’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी उत्सवाने शहरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण केले. थरावर थर रचत दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेल्या गोविंदा पथकांच्या थरारक कसरती, ढोल-ताशांचा गजर आणि हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसर अक्षरशः दुमदुमून गेला.
जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे यांच्या वतीने युवा नेते विकास शिंदे यांच्या मित्र परिवाराने या उत्सवाचे आयोजन केले होते. वाई शहरातील सर्वाधिक १ लाख ५१ हजार १११ रुपयांचे बक्षीस दहीहंडी फोडणाऱ्या विजेत्या पथकासाठी ठेवण्यात आले होते. त्यामुळे विविध गोविंदा पथकांमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळाली.
वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दहीहंडी उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, पंचायत समितीचे सभापती विक्रांत डोंगरे, विकास शिंदे, प्रवीण शिंदे, वसंत तुपे, शरद विटकर, काशिनाथ चोरट, रमाकांत यादव, शाम चावलानी, नाना पिसाळ, तरुण शिंदे, तनिश शिंदे, त्रिशिव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
सिद्धनाथवाडीच्या गोविंदांनी मारली बाजी
दहीहंडी फोडण्यासाठी मैदानात उतरलेल्या सिद्धेश्वर क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळ, सिद्धनाथवाडी यांनी उत्कृष्ट समन्वय, चिकाटी आणि कौशल्याचे प्रदर्शन करत दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला. त्यांच्या थरारक कामगिरीला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोषात दाद दिली.
दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनी मोठी गर्दी केली होती. ढोल-ताशांचा निनाद, ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषाने आणि गोविंदा पथकांच्या उत्साहाने वाई शहरातील वातावरण भक्तिमय उत्साहात रंगून गेले.
आयोजनासाठी कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम
उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रणव थोरवे, दादासाहेब काळे, दत्तात्रय वाडकर, धीरज ओसवाल, उमेश माने, राजेश कावडे, नितीन चोरट, सचिन वायदंडे, पांडुरंग वरे, दत्तात्रय पोळ, सोपान चिकणे, धनंजय चव्हाण, बबलू मुलाणी, तुकाराम तुपे, अमीन वनारसे, धनंजय मुलीय, अमोल चोरट, रवी मोझर, स्वप्नील त्रिंबके, प्रथमेश ढोणे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे स्वागत व आभार विकास शिंदे यांनी मानले. उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यंदाची दहीहंडी वाई शहरातील लक्षवेधी उत्सव ठरली.




