क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:-भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी.

पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहर अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पुणे:-भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी.

बेकायदेशीर अग्नीशस्त्र हातळत असताना त्यातुन फायरींग झालेल्या गुन्हयातील सराईत पाहीजे आरोपीतास १ पिस्टल व काडतुसासह भारती विद्यापीठ पोलीसांकडुन अटक.

दिनांक ०१/०९/२०२६ रोजी ००.३० वा. साईसिध्दी चौक, आंबेगाव पठार, पुणे येथे आरोपी नामे संकेत गोरक्ष चोरघे, रा. मु.पो. कोलवडी ता. वेल्हा जि. पुणे याने त्याचे ताब्यात बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगले. तसेच संकेत चोरघे याचेकडे पिस्टल आहे याची माहीती सनी उर्फ संदीप सुभाष दीपक, अविनाश मोरे, यांना असताना त्यांनी सदरची माहीती पोलीसांना लपवुन, सदरचे पिस्टल संकेत गोरक्ष चोरघे याचेकडुन घेवुन ते स्वतः हाताळले. त्यानंतर तसेच संकेत चोरघे याने पिस्टल स्वतकडे घेवुन त्यास स्वतःची व इतरांची व्यक्तीगत सुरक्षीतता धोक्यात येऊ शकते याची त्यास जाणीव असताना देखील त्याने पिस्टल बेदकरारपणे निष्काळजीपणाने हाताळून, सदर पिस्टलमधुन गोळी सुटुन ती गोळी सनी उर्फ संदीप सुभाष दीपक याचे मांडीत लागुन त्यास गंभीर जखमी करण्यास कारणीभूत झाला आहे म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुरनं ४५२/२०२६ भारतीय न्याय संहीता कलम १२५ (अ), (ब), भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), २७, ३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), (३), १३५ अन्वये गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयातील आरोपी संकेत गोरख चोरघे, वय ३० वर्षे, रा. कोळवडी, ता. वेल्हा, जि. पुणे हा गुन्हा करुन झाल्यानंतर पिस्टल घेवुन पसार झाला होता. आरोपी संकेत गोरख चोरघे याचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे सपोनि अविनाश पवार, पोलीसउप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सोहम शेंडकर हे शोध घेत असताना तो गदा चौकाजवळील सव्हींस रोडवर थांबला आला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली. लागलीच अधिकारी व अंमलदार यांनी गदा चौक येथील सव्हीस रोडजवळ जावून सापळा रचुन थांबले असताना आरोपी संकेत गोरख चोरघे, वय ३० वर्षे, रा. कोळवडी, ता. वेल्हा, जि. पुणे हा गुन्हयात वापरलेल्या पिस्टल व काडतुसासहीत मिळुन आल्याने त्याचेकडुन सदरची अग्नीशस्त्रे जप्त करुन त्यास अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मिलींद मोहीते, पोलीस उप आयुक्त परिमंडळ, पुणे शहर, राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पवार, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सोहम शेंडकर, सागर ‘कोंडे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, किरण साबळे, मंगेश गायकवाड, मंगेश पवार, तुकाराम सुतार, संदीप आगळे, यांच्या पथकाने केली आहे.
(सुदर्शन गायकवाड) वरीष्ठ पोलीस निरीक्षक

भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button