आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबई:-मेघवाडीत रंगला ‘गुणगौरव समारंभ’; अभिनेते महेश्वर तेटांबे यांच्याकडून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव..!

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मुंबई:-मेघवाडीत रंगला ‘गुणगौरव समारंभ’; अभिनेते महेश्वर तेटांबे यांच्याकडून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव..!

मुंबई, लालबाग (विशेष प्रतिनिधी: प्रभाकर तोडणकर):
लालबाग, मेघवाडी येथील ७५ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या सरकारमान्य संस्था ‘बाळ विकास मंडळ’च्या वतीने सन २०२६ चा गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव समारंभ’ अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात पार पडला. बालवाडीपासून ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या विविध वर्गांतील बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस आणि शालेय वस्तूंचे वाटप करून सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक व पत्रकार सन्माननीय श्री. महेश्वर भिकाजी तेटांबे उपस्थित होते. त्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. मंडळाचे प्रमुख कार्यवाह श्री. अक्षय माळकर यांनी प्रमुख अतिथी श्री. महेश्वर तेटांबे यांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे संस्थापक सदस्य श्री. प्रभाकर तोडणकर व संयुक्त कार्यवाह श्री. स्वप्निल पाताडे उपस्थित होते.
*गुणगौरव प्राप्त बक्षीसपात्र विद्यार्थी:*
बालवाडी: शिवांश बारसकर, स्वराज चेतन तेंडोलकर, आरव स्वप्निल पाताडे, कु. जिज्ञा नारायण परब, मिहित सिद्धेश तोडणकर, दक्ष चौगुले.
इयत्ता १ ली: विहान अशोक सिंग, सूर्या सुरेश पेडणेकर, शिवांश विनायक कुवरे, कु. सांची सचिन जोशी, मिहिर मिलींद गावकर, अथांग मनिष शिवगण, दीक्षा अजय लोके.
इयत्ता २ री: कु. निधी सचिन जोशी, कु. जिज्ञा नारायण परब, नैतिक योगेश नाचणेकर, कु. प्रचिती प्रथमेश पालव, मनस्वी विक्रम राणे.
इयत्ता ३ री: आरोही अरुण टुकरूल, विशाल संदेश तेली, यथार्थ संकेत चव्हाण, अथीश्री रोशन जामदार, परी विवेक सिंग.
इयत्ता ४ थी: क्रिशा चेतन गावकर, विराज रमाकांत पांचाळ, स्वरा सचिन परवडी, शर्वी राज पवार.
इयत्ता ५ वी: साव्या गिरीश सुर्वे, यश धोंडीराम सावंत, राशी राकेश देसाई, श्रीया सचिन अपंडकर, अक्षय मनिष शिवगण, प्राची योगेश नाचणेकर.
इयत्ता ६ वी: तनिषा जितु बोरीचा, विहग रविंद्र दळवी.
इयत्ता ७ वी: शंतनू संदिप राणे, पूर्वा योगेश नाचणेकर, साहिल अक्षय माळकर.
इयत्ता ८ वी: निरव महेश सोसा.
इयत्ता ९ वी: साईश कासले, श्वेता संदिप रावराणे, श्रीया सतीश पालव, देवांग जितु बोरीचा, आरुषी.
इयत्ता १२ वी: भक्ति धोंडीराम सावंत.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते स्वप्निल पाताडे, चेतन तेंडोलकर, अजिंक्य नकाशे, मनिष बरडे, प्रथमेश पालव, सिद्धेश तोडणकर, प्रविण चव्हाण, धोंडीराम सावंत, भाई सुर्वे व भाऊ पाताडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button