बारामती:-येथे स्काऊट गाईडच्या उजळणी वर्गाची सुरुवात.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

बारामती:-येथे स्काऊट गाईडच्या उजळणी वर्गाची सुरुवात.

मायणी प्रतिनिधी———-
बारामती स्काऊट गाईड स्थानिक संस्था आणि बारामती पंचायत समिती शिक्षण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने सोमवार दि 07/09/2026 रोजी नटराज नाट्य कला दालन बारामती येथे बारामती तालुका स्तरीय उजळणी वर्गाची सुरुवात स्काऊंट /गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडण पॉवेल यांच्या प्रतिमा पुजनाने व दया कर दान या प्रार्थनेने झाली.
या वर्गात बारामती तालुक्यातील 29 स्काउटर / गाईडर उपस्थित होते. या उजळणी वर्गाचे संचलन श्री लक्ष्मण निवृत्ती थोरात (ALT. s) व संस्था सचिव श्री सूर्यकांत गौतम् सोनवणे(ALT. s)यांनी केले तसेच सहाय्यक म्हणून श्री पानगे हनुमंत, श्री ढोपरे मुगुटराव, श्री जनार्दन शिंदे सर, श्रीमती मयुरा चव्हाण यांनी कार्य केले..
या वर्गात स्काऊटिंग मधील विविध कौशल्यावर आधारीत सहभागी युनिट अधिकारी यांना माहिती व प्रशिक्षण देऊन सरावं करून घेतला.
या उजळणी वर्गासाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा स्काऊंट संस्थेचे अध्यक्ष मा.किरणदादा गुजर यांनी नटराज नाट्य कला दालन बारामती येथे उपलब्ध करून दिले आहे. नियोजित वेळेनुसार उजळणी वर्गाची राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली..




