श्रीरामपूर:-ज्येष्ठ नागरिक बेपत्ता होऊन महिना उलटला पोलिस तपास कुचकामी ठरतोय का ?
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

ज्येष्ठ नागरिक बेपत्ता होऊन महिना उलटला पोलिस तपास कुचकामी ठरतोय का ?

श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) हरेगाव ( ता . श्रीरामपुर ) येथील मूळ रहिवासी हरीभाऊ सीताराम बोधक हे गेल्या एक महिन्यापासून बेपत्ता असून त्यांच्या कुटुंबीयांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे . थेरगाव – काळेवाडी (जि पुणे ) येथे आपल्या नातवाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले असताना शनिवार दिनांक १३ डिसेंबर २० २५ रोजी ते अचानक अस्ता फाटा परिसरातून बेपत्ता झाल्याची घटना घडली
कुटुंबायांनी दिलेल्या माहितीनुसार ‘ हरिभाऊ बोधक पुणे रेल्वे स्थानक परिसरात असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांचा पाठलाग केल्याचे काही नागरिकांनी पाहिल्याची माहिती समोर आली आहे . त्यामुळे या घटनेत घातपात झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीती कुटुंबीय व्यक्त करत आहेत . या प्रकरणाला तब्बल एक महिना पुर्ण होऊनही पोलिस तपासात कोणतीही ठोस प्रगती दिसून येत नाही ‘ असा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे . संबंधित पोलीस तपासात कोणतीही ठोस प्रगती दिसून येत नाही असा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे . संबंधित पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यात आली असली तरी अद्याप हरी भाऊ बोधक यांचा कोणताही मागोवा लागलेला नाही .
दरम्यान ‘ या घटनेमुळे हरेगाव परिसरातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून तपास अधिक वेगाने व सखोल पद्धतीने करावा ‘ तसेच संशयित व्यक्तीचा शोध घेऊन सीसीटीव्ही फुटेज ‘ मोबाईल लोकेशन यांचा आधार घ्यावा ‘ अशी मागणी नातेवाईक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
पोलिस प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन हरीभाऊ बोधक यांचा शोध तात्काळ लावावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




