क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाईत ‘मसल्स’चा महायुद्ध! ‘दक्षिल श्री २०२६’चा दमदार डंका; पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज बॉडीबिल्डर्सचा ताकदीचा जल्लोष.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

1) वाईत ‘मसल्स’चा महायुद्ध!
‘दक्षिल श्री २०२६’चा दमदार डंका; पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज बॉडीबिल्डर्सचा ताकदीचा जल्लोष.

सातारा प्रतिनिधी | प्रविण गाडे
वाई, दि. ०६ : वाई शहरात शरीरसौष्ठवाचा जबरदस्त जल्लोष रंगणार असून ‘दक्षिल श्री २०२६’ या भव्य स्पर्धेमुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज खेळाडू एकाच मंचावर ताकदीचा थरार उभा करणार आहेत. शरीरसौष्ठवप्रेमींसाठी हा कार्यक्रम म्हणजे अक्षरशः ‘मसल्सचा महाकुंभ’ ठरणार असून क्रीडारसिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
युवा उद्योजक संतोष (दादा) शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पोर्टिका फिटनेस जिमच्या वतीने या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध गटांमध्ये रंगणाऱ्या चुरशीच्या लढतीत खेळाडू आपल्या दमदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करत विजेतेपदासाठी झुंज देणार आहेत. पश्चिम महाराष्ट्र टायटल विजेत्यास १५,००१ रुपये, बेस्ट मस्कुलरला २,००० रुपये, मेन फिजिक ‘दक्षिल श्री’ प्रथम क्रमांकास ५,००० रुपये व ट्रॉफी, तसेच ८० किलो वरील गटासाठी ३,००० रुपये व ट्रॉफी अशी आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे सामाजिक बांधिलकी जपत आजी-माजी सैनिक व शहीद जवानांचा सन्मान सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे हा सोहळा केवळ क्रीडा स्पर्धा न राहता राष्ट्रसेवकांना सलाम करणारा अभिमानाचा क्षण ठरणार आहे.
रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी बहुउद्देशीय शेतकरी हॉल, बाजार समिती, वाई येथे ही स्पर्धा होणार असून वजन तपासणी दुपारी ३ वाजल्यापासून सुरू होईल. सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व रत्नागिरी जिल्ह्यांतील खेळाडूंचा मोठा सहभाग अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी राजेंद्र हेंद्रे सर, धनंजय चौगुले (९९७५२०१३०६) किंवा स्पोर्टिका फिटनेस जिम (८८५००९७०३३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

2) “निषेधाच्या नावाखाली विकास अडवण्याचा प्रयत्न”; राष्ट्रवादीच्या भूमिकेला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर.

वाई | प्रतिनिधी
वाई नगरपालिकेतील विषय समिती निवडीवर राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या निषेधाला भाजपकडून कडक शब्दांत प्रत्युत्तर देण्यात आले आहे. उपाध्यक्ष पदाचा मुद्दा पुढे करून बहिष्काराचा आव आणला गेला; मात्र प्रत्यक्षात शहराच्या विकास प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याचाच हा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
भाजपच्या मते, ९ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर झालेल्या नगरपालिकेच्या सभांमध्ये राष्ट्रवादीने सक्रिय सहभाग घेतला होता. त्या वेळी निषेध नोंदवला गेला नाही, त्यामुळे आता अचानक लोकशाही मूल्यांचा मुद्दा पुढे करणे म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याची टीका करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अधिकृत पक्ष चिन्हावर निवडून आलेले असताना अपक्ष उमेदवाराला मतदान करण्यासाठी दिलेला व्हीप हा कोणत्या लोकशाही मूल्यांचा आदर करणारा होता, असा सवालही भाजपने उपस्थित केला. तसेच मतदारांच्या विश्वासाला धक्का देणारे निर्णय घेतल्यानंतर आता लोकशाहीचा दाखला देणे हे विरोधाभासी असल्याचे नमूद करण्यात आले.
विषय समित्यांच्या निवडीमध्ये सहभागी न होता अर्ज भरण्याची वेळ संपल्यानंतर निषेधाचा मुद्दा पुढे आणण्यात आला, असा आरोप करत भाजपने स्पष्ट केले की, स्थायी समितीची रचना रोखण्याचा आणि नगराध्यक्षांच्या कारभारात अडथळा आणण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. मात्र वाईकर सुज्ञ जनता हा प्रकार ओळखून असल्याचा दावा करण्यात आला.
दरम्यान, झालेल्या सर्व निवडी या १९६५ च्या अधिनियमांतर्गत पिठासीन अधिकाऱ्यांच्या अधिकारानुसारच पार पडल्या असून, शहराच्या विकासासाठी समित्यांच्या माध्यमातून ठोस कामे केली जातील आणि वाईकर नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देण्यात येईल, असा निर्धार भाजपने व्यक्त केला.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button