जावळी:-माझी लढाई विठ्ठलाशी नाही तर बडव्यांशी-आमदार शशिकांत शिंदे
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

1) जावळी:-माझी लढाई विठ्ठलाशी नाही तर बडव्यांशी-आमदार शशिकांत शिंदे

करहर दि: जावळी तालुक्याची ही निवडणूक स्वाभिमानाची लढाई ठरलेली आहे. उमेदवारी मिळतील की नाही. ही संभ्रम अवस्था असताना आता रंगत वाढलेले आहे. अंदर की बात है ..ही काय व्हीआयपीची ऍडव्हर्टाईस नाही .असे सांगून माझी लढाई ही विठ्ठलाची नाही तर बडव्यांशी आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी करहर तालुका जावळी येथील म्हसवे गट व फरशी बारामुरे व म्हसवे गण उमेदवारांच्या सांगता समारंभ निमित्त केले.
यावेळी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संदीप पवार, गणाचे उमेदवार विठ्ठल गोळे व शिल्पा शिंदे तसेच अँड योगेश गोळे, प्रकाश परामणे, अशोक चव्हाण, समिंदरा जाधव, मोहनराव शिंदे, जावळी तालुका अध्यक्ष सुरेश पार्टे, आदी मान्यवर उपस्थित होते. नितीन रांजणे, समीर गोळे, रूपाली भिसे, गोपाळ बेलोशे, अविनाश दुर्गवळे, नितीन गोळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
जावळी तालुक्याने भरपूर प्रेम दिले आहे १८ वर्षानंतरही असे प्रेम मिळायला भाग्य लागते. आगामी निवडणुकीमध्ये मतांची विभागणी होऊ नये. म्हणून राष्ट्रवादी व शिवसेना व सर्व मित्र पक्ष एकत्र आलेले आहेत. या निवडणुकीत चमत्कार घडणार असून माझा त्यावर विश्वास आहे. लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असून ते मतपेटी द्वारे प्रकट होणार आहे. ज्यांनी त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना जातीचा दाखला मिळू नये. यासाठी प्राण कार्यालयात ठिव्या मांडून बसणारे सत्ताधारी होते .ही लोकशाही नाही. आर.टी.ओ.ने इच्छुक उमेदवार सचिन गोगावले यांची वाहने तपासणी केली. अशा आरटीओ अधिकाऱ्यांना खूप माज आला आहे. आगामी अधिवेशन याबाबत प्रश्न विचारला जाईल असे ही आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी लढत नाही तर त्यांच्या सोबत स्वार्थी लोकांच्या विरोधात ही लढत आहे. जावळी सोडली नसती तर मी आजही आमदार झालो असतो. आदरणीय भाऊसाहेब महाराजांच्या उपकारामुळे मी आमदार मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष झालेले आहे ते कधीही विसरणार नाही असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग पाचवड पासून ते कोयना धरणापर्यंत रस्त्याला निधी देण्याचे काम माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आहे. याचाही त्यांनी पुनरुचार केला. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते व आमदार शिंदे यांचे कट्टर समर्थक बाळासाहेब पिसाळ यांनी आभार मानले .
चौकट — म्हसवे जिल्हा परिषद गटामध्ये साड्या वाटप करण्यात आल्या परंतु यामध्ये दोनशे रुपयांचे पॅकिंग पण साड्या सत्तर रुपयांच्या होत्या एवढे येथील मतदार लाचार नाहीत याचीही आठवण करून दिली. हा मतदार माता-भगिनीचा अपमान आहे.
2) जावळी:-करहरला आवडेल त्या मंचकावर दोन प्रतिस्पर्धी पक्षाची प्रचार सभा ..

करहर दि: जावळी तालुक्यामधील ह. भ. प. दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या सांप्रदायिक विचाराने प्रभावित असलेल्या करहर म्हणजे प्रतीक पंढरपूर मानले जाते. या ठिकाणी श्री विठ्ठल रखुमाईच्या साक्षीने चक्क आवडेल तेथे मतदान करा तसेच एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या न्यायाप्रमाणे एकाच मंचकावर दोन राजकीय जाहीर सभा झाल्या. विशेष म्हणजे दोन बॅनर पण एकच सूत्रसंचालक होते.
जावळी तालुक्यातील प्रति पंढरपूर समजणाऱ्या करहर मध्ये गुरुवार हा आठवड्याचा बाजार असतो. याचे गणित जुळवून राजकीय जाहीर सभा घेण्यात आली. दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना व मनसे, उबाटा, काँग्रेस अशा समविचारी पक्षाच्या नेत्यांची सभा झाली. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या शाब्दिक तोफा धडाडल्या. या सभेमध्ये पक्षाचा बॅनर आणि नेत्यांची छबी दिसत होती. त्यानंतर दोन तासाच्या कालावधीनंतर भाजप प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी मंचक उभारणाऱ्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्या ठिकाणी असलेल्या राष्ट्रवादीचे पोस्टर व बॅनर काढून त्वरित भाजपचे बॅनर लावले. भाजपची सभेची रंगत सुरू झाल्यानंतर गायनाची पार्टी झाली. पण पहिल्या सभेला सूत्रसंचालन करणारे प्रमोद पवार यांचे दुसऱ्या सभेलाही आगमन झाले. आणि त्यांनी राष्ट्रवादी पक्ष विसरून भाजपच्या कोड कौतुक करण्यास सुरुवात केली. खर म्हणजे ही त्यांची कला खूप काही सांगून जाते. सूत्रसंचालन ही कला आहे. परंतु त्याहीपेक्षा एकाच मंचकावर दोन प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्यांचे कोडकौतुक करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पूर्वीच्या सभेला उपस्थित मतदारांनी राष्ट्रवादीच्या टोप्या घातल्या होत्या. नंतर दुसऱ्या सभेला भाजपचा फडा घालूनच काहीजण बसले होते. खऱ्या अर्थाने राजकीय वैर विसरून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ… असेच खेळाडूपणाने वातावरण पाहण्यास मिळाले. आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या सभेला एकाने गोंधळ घातला परंतु दुसऱ्या सभेला दुसऱ्या एकाने नशापान करून शांत बसला होता. हा फरक सुद्धा जाणवत होता. या ठिकाणी आवडेल तेथे मतदान करा. अशी खेळाडू वृत्ती दिसून आल्याने प्रचारक व नेते सुद्धा सुखावले आहेत. भाजपच्या नेत्यांनीही सडेतोड उत्तर देऊन ये अंदर की बात है,, जनता हमारे साथ है.. हे सांगण्यास विसरले नाहीत. मात्र, सभा ऐकण्यात आलेल्यांच्या वैचारिक गोंधळामुळे मतदान नक्की करायचं पण कोणाला? हे आता मतदान केंद्रामध्ये प्रवेश केल्यानंतरच उघड होणार आहे.




