साकुरी:-(अहिल्यानगर)-बलसागर भारत होवो; विश्वात शोभिनी राहो भारतीय प्रजासत्ताकदिन.(26/1/2026)
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

बलसागर भारत होवो; विश्वात शोभिनी राहो
भारतीय प्रजासत्ताकदिन.(26/1/,2026)

लाहोर या ठिकाणी कोंग्रेसचे एक भव्य असे अधिवेशन भरले होते. साधारणपणे पन्नास हजाराच्या आसपास प्रतिनिधी या आधिवेशनासाठी उपस्थित होते. हे अधिवेशन झाल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी 2 जानेवारी 1930 ला नवीन कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली व त्या कार्यकारिणीची एक भव्य लाहोर या ठिकाणी घेण्यात आली.या बैठकीमध्ये 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दीन म्हणून पाळण्यात यावा असा विचार संमत करण्यात आला. त्या दिवशी सर्व भारतीय जनतेने स्वातंत्र्य मिळण्याची प्रतिज्ञा घ्यावी असा निर्णय ठरला.
आणि मग ठरल्याप्रमाणे 2 जानेवारी 1930 रोजी झालेल्या निर्णयानुसार 26 जानेवारी 1930 रोजी जनतेने स्वातंत्र्य मिळवीण्याची प्रतिज्ञा केली. आणि त्या नंतर साधारणपणे 17 वर्षानंतर म्हणजेच 15 ऑगस्ट 1947साली आपला भारत देश स्वतंत्र झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहर लाल नेहरू यांनी लाहोर येथील झालेल्या निर्णयाची आठवण म्हणून 26जानेवारी हाच दिवस प्रज्यासत्ताक दीन म्हणून मान्य केला.
महात्मा गांधी यांनी अहिंसेवर दृढ विश्वास ठेऊन सत्याग्रहाच्या मार्गाने राष्ट्रीयत्वाची जाणीव देशात निर्माण करण्याचे कार्य केले. या मध्ये. वासुदेव बळवंत फडके. भगत सिंग. राजगुरू. बाबू गेनु. या क्रांती कारकांचा मोठा त्याग आहे. हे मान्य करावेच लागेल.परंतु सर्व भारतीयांना सामावून घेणारी चळवळ सर्व भारतीयांची चळवळ ठरली.म्हणून माझ्या मते स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या ह्या भावी पिढी ला स्वातंत्र्याचा स्फूर्तिदायक इतिहास सांगणे आवश्यक आहे.
माझी सद्सदद्विवेक बुध्दी असे सांगते की. स्वातंत्र्य दीन आणि प्रज्यासत्ताक दीन या दोन्ही स्वातंत्र्याला आत्ता प्रौढत्व आलेले आहे.लोकांचे.लोकांनी . लोकांसाठी चालविलेले राज्य अशी लोकशाहीची व्याख्या करण्यात आलीआहे..
आपल्या भारताचीराज्य घटना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली आहे.आणि या घटनेने प्रज्यासत्ताकातून संपूर्ण भारतीय जनतेला समान हक्क दिले आहे. थोडक्यातया प्रज्यासत्ताकातून ^एक वेक्ती एक मत^ ही समानता भारतीय लोकश्याहिला दिली आहे. मात्र श्रीमंत- गरीब ; स्पृश्य- अस्पृश्य असा भेदभाव यात करण्यात आला नाही.आणि आपल्या या एक मताचा वापर करून आपले प्रज्यासत्ताक टिकउन धरले आहे.
आपल्या देशाच्या परिवर्तनासाठी. आर्थिक;सामाजिक: राजकिय बाबतीत सातत्याने अखंड परिश्रम करत राहणे अतिशय महत्वाचे आहे.. स्वातंत्र्य टिकविण्याकामि त्यागाची तयारी ठेवणे आणि प्रसंगी संघर्ष देखिल करणे हीच या लोकशाही घटनेतील प्रत्येक नागरिकांची संस्कृती आहे.तितकेच महत्त्वाचे या देशात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन होणे अतिशय महत्वाचे आहे. अशी भावना महात्मा गांधीजी ची होती . आणि म्हणूनच स्वातंत्र्या बरोबरच काही महत्वाच्या परंतु रचनात्मक कार्यासाठी गांधीजीनी सुरुवाती पासूनच आग्रह धरला होता. मागासलेल्यांचा उद्घार करणे.. ग्रामसफाई. खादीची चळवळ या सामाजिक चळवळी वाढत गेल्या. सध्याच्या आपल्या या स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये विविधतेतून एकता निर्माण करून जागतिक लोकशाहीचा पाया व्हावा हेच स्वप्न आजच्या या तरुण पिढीचे असावे असे माझे प्रामाणिक मत आहे.खऱ्या प्रज्यासास्त्तक दिनाची दिश्या अशी असावी की^ सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन सामान्य माणसापर्यंत सत्ता नेणे.^ हे प्रत्येक भारतीय नागरिकाने लक्ष्यात ठेवण्यासारखी अतीशय महत्वाची गोष्ट आहे.समता.हाच युग धर्म मानणे..भावी पिढीच्या मनावर चांगले संस्कार घडविणे. समानतेवर आधारित नवीन वेवस्था निर्माण करणे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्याचा जो दिश्याहिन तरुण आहे. जबाबदारी टाळू पाहणारा तरूण वर्ग आहे.त्या सर्वांनी आपल्या भारत देश्याला अधिकाधिक उंच स्तरावर नेऊन पोहचयायचे असेल तर ^ व्यसन मुक्ती^ही अतिशय महत्वाची आहे. सर्वानाच या दारू; गांज्या; अफू; गुटखा; बिडी; सिगारेट; पानमसाला;तंबाखू या जीवघेण्या व्यसना पासून दूर राहणे व जात- पात.; गरीब- श्रीमंत ; काळा- गोरा हा भेदभाव विसरून आपला संपूर्ण भारत देश एक आहे. या देश्यतील सर्व माझे बंधू- भगिनी आहेत.या भावनेनेच आचरण करणे अतिशय महत्वाचे आहे.
या प्रज्यासत्ताक दिनानिमिताने मी माझ्या सर्व तरुण बांधवांना अती नम्रपणे सूचित करू इच्छितो की^^ या जीवघेण्या व्यसना पासून दुर रहा व आपल्या या भारत देश्याला उंच स्तरावर नेऊन पोहचवा.थोडक्यात
^^ व्यसन करण्यात नाही रे तरुणा मजा; ही तर आपल्या देहास आहे मरणाची सजा^^ शेवटी लिहिता लिहिता देशाभिमान जागृत होऊन असे म्हणावेसे वाटते की ✓^ ^उत्सव तीन रंगाचा; आभाळी आज सजला;नतमस्तक मी त्या चरणी ‘ ज्यांनी भारत देश घडविला^^
^जयहिंद^
मा.प्रा.ज्ञानेश्र्वर कृष्णाजी बनसोडे सर (एम ए बी एड)
साकुरी. ता.=राहता.जिल्हा=.अहिल्या नगर
मो.9604797316




